चीनमध्ये दहशतवादी हल्ल्यात १० ठार
By Admin | Updated: July 31, 2014 03:50 IST2014-07-31T03:50:31+5:302014-07-31T03:50:31+5:30
चीनच्या हिंसाचारग्रस्त शिनचियांग प्रांतामध्ये ईदच्या पूर्वसंध्येस एका जमावाने चाकू आणि कुऱ्हाडीने केलेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात १० नागरिक ठार

चीनमध्ये दहशतवादी हल्ल्यात १० ठार
बीजिंग : चीनच्या हिंसाचारग्रस्त शिनचियांग प्रांतामध्ये ईदच्या पूर्वसंध्येस एका जमावाने चाकू आणि कुऱ्हाडीने केलेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात १० नागरिक ठार, तर इतर अनेक जखमी झाले. हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत २२ दहशतवादी मारले गेले. दहशतवादी हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले असून, हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुस्लिमबहुल उईघुर प्रांतात ईददरम्यान झालेल्या हल्ल्यात अनेक नागरिक ठार किंवा जखमी झाले, असे वृत्त चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सोमवारी रात्री दिले होते. मात्र, या वृत्तसंस्थेने हल्ल्याची विस्तृत माहिती दिली नव्हती.