बांगलादेशमध्ये चेंगराचेंगरीत १० हिंदू ठार

By Admin | Updated: March 28, 2015 09:51 IST2015-03-27T14:26:19+5:302015-03-28T09:51:47+5:30

बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दहा हिंदू भाविक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

10 Hindu killers in Bangladesh stampede | बांगलादेशमध्ये चेंगराचेंगरीत १० हिंदू ठार

बांगलादेशमध्ये चेंगराचेंगरीत १० हिंदू ठार

>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २७ - बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दहा हिंदू भाविक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावर अस्तमी स्नानासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दहा जण ठार तर अनेक भाविक जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले स्वयंसेवक व पोलिसांची संख्या कमी असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप काही यात्रेकरुंनी केला.
 

Web Title: 10 Hindu killers in Bangladesh stampede