शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

लंडनमध्ये मशिदीजवळ भाविकांच्या गर्दीत घुसवली व्हॅन, 1 ठार, 10 जखमी

By admin | Published: June 19, 2017 10:42 PM

रमजानच्या विशेष प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एकाने भरधाव व्हॅन घुसवली.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 19 - रमजानच्या विशेष प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एकाने भरधाव व्हॅन घुसवली. यात एक ठार, तर दहा जण जखमी झाले. उत्तर लंडनमध्ये सोमवारी ही घटना घडली. गेल्या चार महिन्यांत ब्रिटनला हादरविणारा हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. सेव्हन सिस्टर्स रोडवरील मुस्लिम वेल्फेअर हाऊसजवळ मध्यरात्रीनंतर मुस्लिम भाविक रस्त्यावर पडलेल्या माणसाला मदत करीत होते. तेव्हा हल्लेखोराने त्यांच्या घोळक्यात व्हॅन घुसवली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले. किरकोळ दुखापतीमुळे अन्य दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी व्हॅनचालकाला (वय ४८) पकडले. नंतर पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून त्याला अटक केली. हा मुस्लिमांवर हेतुपुरस्सर करण्यात आलेला हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही धक्कादायक घटना असून, पोलीस दहशतवादी कृत्याच्या अनुषंगाने तपास करीत आहेत, असे गृहमंत्री अ‍ॅम्बर रूड यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर लोकांनी आधीच प्रथमोपचार केले होते. त्यामुळे त्या व्यक्तीचा व्हॅनच्या धडकेने मृत्यू झाला, असा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही, असे सहायक पोलीस आयुक्त नील बसू यांनी सांगितले. या घटनेला दहशतवादी हल्ला मानण्यात येत असून, दहशतवाद प्रतिबंधक पथक याचा तपास करीत आहे. या घटनेत आणखी कोणाचा हात असल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही, असेही ते म्हणाले. या घटनेचे साक्षीदार अब्दुल रहमान यांनी सांगितले की, व्हॅनचालक ‘मला सर्व मुस्लिमांना ठार मारायचे आहे’, असे म्हणत होता. व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्याला पकडले. मी त्याच्या पोटात गुद्दा मारला. त्यानंतर मी आणि इतरांनी त्याला जमिनीवर पाडले. पोलीस येईपर्यंत आम्ही त्याला पकडून ठेवले, असेही ते म्हणाले. दुसऱ्या एका साक्षीदाराने सांगितले की, आम्हाला वेगात धडक देण्यासाठीच व्हॅन आमच्या दिशेने आणण्यात येत होती. अटक केल्यानंतर व्हॅनचालक ‘मी पुन्हा हे करेन, मी पुन्हा हे करेन’, असे म्हणत होता. हल्ल्यामागील कारणाचा छडा लावण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडून तपास सुरू आहे. लंडन हे अनेक धर्म आणि राष्ट्रीयत्वांचे शहर आहे. एखाद्या समुदायावरील हल्ला हा आम्हा सर्वांवरील हल्ला आहे. दहशतवादी आमच्यात फूट पाडून आम्हाला दहशतीखाली जगण्यास भाग पाडण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले. ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी या दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याचे यापूर्वी म्हटले होते.