शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल

By जयदीप दाभोळकर | Updated: February 3, 2021 12:30 IST

पाहा काय आहे यामागची हृदयस्पर्शी कहाणी

ठळक मुद्देआयएएस अधिकाऱ्यानं फोटो शेअर करत केलं कौतुकत्या व्यक्तीनं स्वीकारली वडील आणि शिक्षक ही दोन्ही जबाबदारी

आयुष्यात प्रत्येकाच्याच जीवनात काही ना काही अडचणी येत असतात. आपण त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळा अडचणींचा डोंगर इतका मोठा की एक वेळ अशी येते की आपण आता त्याच्यासमोर कमी पडू की काय असाही विचार येतो. सोशल मीडियावर सध्या एक असा फोटो व्हायरल होतोय जो नक्कीच सर्वांना एक सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक वडील आपल्या तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. यामागची कहाणी ऐकली तर कदाचित तुमचेही डोळे पाणावतील.अडचणीवर मात कशी करायची हे हा फोटो नक्कीच आपल्याला शिकवून जातो. प्रशासकीय अधिकारी (आयएएस) अवनिश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक वडील आपल्या तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा फोटो शेअर केला आहे. हाच खऱ्या आयुष्यातील हिरो असं म्हणत त्यांनी या शिक्षकाचं कौतुकही केलं आहे. या तान्हुल्या बाळाचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळी त्याच्या आईचं निधन झालं. त्यामुळे बाळाचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी त्याच्या वडिलांवर आली. बाळाचे वडील हे महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या बाळासह आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. आपलं कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या बाळाला पोटाशी बांधून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. या फोटोमध्येही ते आपल्या बाळाला पोटाशी बांधून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. अवनीश शरण यांनी ३ फेब्रुवारी रोजी ही पोस्ट शेअर करत त्यांना खऱ्या आयुष्यातील हिरो असं संबोधलं आहे. त्यांच्या या पोस्टला अनेक युझर्सची पसंती मिळत आहे.    

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीcollegeमहाविद्यालयProfessorप्राध्यापकTwitterट्विटर