शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:55 IST

Inspirational Stories: शाळकरी वयात चार वर्षांत तीन वेळा कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागलेल्या धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट वाचत होते. तिचा कॅन्सर सोपा नव्हता. शिवाय ऐन करिअर निवडीच्या काळात हा पाहुणा  आजार तिच्याकडे पोहोचला.

- वंदना अत्रे(दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)आपण कशासाठी जगत असतो, असा प्रश्न कोणी आपल्याला विचारला तर आपण गांगरून जातो. चटकन त्याचे उत्तर आपल्याला सुचत नाही. एखाद्या आजाराने त्रस्त होऊन हॉस्पिटलच्या पलंगावर पडायला लागल्यावर मात्र हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. अनेकदा जगण्याबद्दलचा उद्वेग त्यामध्ये असतो.शाळकरी वयात चार वर्षांत तीन वेळा कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागलेल्या धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट वाचत होते. तिचा कॅन्सर सोपा नव्हता. शिवाय ऐन करिअर निवडीच्या काळात हा पाहुणा  आजार तिच्याकडे पोहोचला. ऐन नववीमध्ये कॅन्सरचे निदान प्रथम झाले. दहावी संपता संपता तो परत उलटला आणि थेट बारावीपर्यंत रेंगाळला. पण, तरीही पराभूत भावना या मुलीने कधीच तिच्या जवळपाससुद्धा येऊ दिली नाही. तिने याचे श्रेय तिच्या आजोबांना दिले आहे.

तरुण वयात उत्तम घोडेस्वारी करणारे, स्पर्धांमध्ये जिंकणारे आजोबा एका स्पर्धेत असे जबर जायबंदी झाले की, त्यांना पुन्हा घोड्याचा लगाम हातात पकडणेसुद्धा शक्य होऊ नये. पण, आपल्या अपघाताची भावनिक झळ त्यांनी कधीच आपल्या कुटुंबाला लागू दिली नाही. अपघातातून वाचून घरी आल्यावर आपल्या कुटुंबाशी बोलताना ते म्हणाले, घोडेस्वारी करण्याची सक्ती कोणी माझ्यावर केली नव्हती. मी त्याचा खूप आनंद घेतला आणि तो मला आयुष्यभर साथ देत राहील.

धनश्रीही असे काहीसे म्हणाली, ‘कॅन्सरला मी कधीच माझ्या जीवनात बोलावले नव्हते. पण, एक मला ठाऊक आहे. त्याला जेवढा आणि जसा मुक्काम करायचा तेवढा करून तो जाणार आहे. मी माझ्या उद्दिष्टावरून माझे लक्ष हटवणार नाही.’- याच धैर्याने ती येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उपाय शोधत राहिली. अगदी बारावीची परीक्षासुद्धा लेखनिक घेऊन तिने पार पाडली.

तिला डॉक्टर व्हायचे आहे. आता त्या उद्दिष्टात एक छोटा बदल आला आहे. आता तिला कॅन्सरतज्ज्ञ व्हायचे आहे ! जगण्याचे छोटे का होईना, उद्दिष्ट जेव्हा आपल्या मनात असते तेव्हा असे मध्ये मध्ये येणारे आजार हे रस्त्यावर येणाऱ्या स्पीड ब्रेकरसारखे असतात. त्याचा बागुलबुवा किती करायचा?(lokmatbepositive@gmail.com)

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीHealthआरोग्य