शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 09:01 IST

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे.

गाजीपूर- 

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे. अंदमान-निकोबारमध्ये जी-२० देशांच्या बैठकीचं व्यवस्थापन करणाऱ्या टीमचा सदस्य होण्याची संधी प्रतिकला मिळाली. प्रतिक मध्यमवर्गीय कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करतो. त्याचे वडील गेल्या २८ वर्षांपासून सेल्समनची नोकरी करत आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही प्रतिकनं हॉटेल मॅनेजमेंटसारख्या खर्चिक शिक्षणाचा मार्ग पत्करला. एकेकाळी गरिबीमुळे उपाशी झोपावं लागलेल्या प्रतिकच्या आजच्या यशावर त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड अभिमान आहे. 

प्रतिकनं नुतकंच नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याची आजवरची कहाणी सांगितली. "जेव्हापासून मी कळत्या वयाचा झालो तेव्हापासून मी माझ्या वडिलांना कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करताना पाहत आलो आहे. त्यामुळे लहान वयातच मला घरची आर्थिक परिस्थिती कळली होती. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गाझीपूरच्या एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. काम करत असताना हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास केला तर उत्तम प्लेसमेंट आणि मोठ्या पॅकेजची नोकरी मिळू शकते हे माझ्या लक्षात आलं", असं प्रतिक सांगतो. 

एकदा प्रतिकनं केंद्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या दिल्लीस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग अँड न्यूट्रिशनमध्ये अर्ज केला. प्रतिकलाही गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला. आता प्रवेशाच्या वेळी भराव्या लागणाऱ्या फीची व्यवस्था करण्याचं आव्हान प्रतिक आणि त्याच्या कुटुंबियांसमोर होतं. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेतले आणि प्रतिकला दिले, जेणेकरून तो त्याची फी भरू शकेल.

मुलाच्या अॅडमिशनसाठीही जाऊ शकले नाहीत वडीलआपल्या मुलाच्या अॅडमिशनसाठी दिल्लीला जाण्याची खूप इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे जे शक्य होऊ शकलं नाही. दोन जणांचा खर्च करण्यात काही अर्थ नव्हता असं त्यावेळी आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे मुलानं एकट्यानंच जाऊन प्रवेश घेतला होता, असं प्रतिकचे वडील ओमप्रकाश जयस्वाल सांगतात. तसंच माझ्या मुलानं जो संघर्ष केलाय तो इतर कुणाला करावा लागू नये, असंही ते पुढे म्हणतात. 

ओमप्रकाश जयस्वाल लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. तर ते ८ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आईची मायाही हरपली. अशा परिस्थितीत ओमप्रकाश जयस्वाल यांच्या तीन बहिणी आणि दोन भावांचा सांभाळ त्यांच्या मामानं केला. घरची जबाबदारी असल्यानं ओमप्रकाश यांनी लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील असं ठरवलं. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य येण्यासाठी गेल्या २८ वर्षांपासून एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत असल्याचं ओमप्रकाश सांगतात. 

प्रतिकला अशी मिळाली संधीप्रतिक १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स करत होता. यादरम्यान त्याला एका मोठ्या संस्थेची कार्यशैली समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. प्रतिकनं दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेल गाठलं. तिथं त्याने संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन काम शिकण्याची संधी देण्याची विनंती केली. प्रतिकला ताजमान सिंग येथे काम शिकण्याची संधी मिळाली. डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतरच त्याला इंटर्नशिपसाठी पात्र समजलं जायला हवं होतं. पण शिकण्याची इच्छा पाहून प्रतिकला ताज मानसिंग यांच्या व्यवस्थापनातील लोकांनी त्याला संधी दिली.

अंदमानमधील कार्यक्रम हाताळण्यासाठी दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमधून ५ जणांची टीम पाठवली जाणार होती. प्रतिकही ५ जणांच्या टीममध्ये सामील झाला. सुरक्षेच्या कारणास्तव G-20 देशांच्या बैठकीत मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी न मिळाल्याची खंत असल्याचं प्रतिक सांगतो. नाहीतर या मोठ्या प्रसंगाच्या आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून टिपता आल्या असत्या.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी