शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:58 IST

रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं.

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष आणि सैन्यात सेवा बजावलेले निवृत्त मेजर जनरल आलोक राज यांनी सोशल मीडियावर एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट शेअर केली. स्थानिक दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ही गोष्ट गज्जू म्हणजेच ​​गजेसिंह यांची आहे ज्यांनी संघर्ष केला आणि यशाच्या शिखरावर पोहोचले. आज ते त्याच रेल्वे स्टेशनचे अधीक्षक झाले आहेत जिथे ते एकेकाळी बूट पॉलिशिंगचं काम करायचे. रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. 

एका रिपोर्टनुसार, गजेसिंह राजस्थानमधील ब्यावर रेल्वे स्टेशनचे अधीक्षक बनले आहेत, त्याच स्टेशनवर ते ३५ वर्षांपूर्वी गज्जू नावाने बूट पॉलिशिंगचं काम करत होते. गजेसिंह यांच्याकडे लहानपणी पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून ते त्यांच्या बालपणीचा मित्र मुरलीसोबत पुस्तकं खरेदी करायचे आणि पुस्तकं फाडून दोन तुकडे करायचे आणि दोघे ते एक-एक करून वाचायचे. 

कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी, गजेसिंह शाळेतून आल्यानंतर इतर मुलांसह बूट पॉलिशचा एक बॉक्स आणि दोन ब्रश घेऊन रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे आणि दररोज प्रवाशांचे बूट पॉलिश करायचे, ज्यामुळे त्यांना दररोज २०-३० रुपये मिळत असत. यानंतर आणखी पैसे कमवण्यासाठी त्यांनी बँड सदस्यांसोबत बँड वाजवण्यास सुरुवात केली ज्यासाठी त्यांनी ५० रुपये मिळाले. 

गजेसिंह यांनी २५ वेळा स्पर्धात्मक नोकरी परीक्षा उत्तीर्ण केली परंतु अनेकदा मुलाखतींमध्ये ते नापास झाले. त्याने कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सीपीओ सब इन्स्पेक्टर आणि एसएससी अशा स्पर्धा परीक्षा दोनदा दिल्या आहेत. सहाय्यक स्टेशन मास्टरसाठी रेल्वे भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना २००८ मध्ये बिकानेर, वीरदवल-सुरतगड येथे स्टेशन मास्टर म्हणून पहिलं पोस्टिंग मिळालं. ३५ वर्षांनंतर, ते त्याच स्टेशनवर अधीक्षक झाले जिथे ते बूट पॉलिशिंगचं काम करायचे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी