CoronaVirus News: मानलं राव! या जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टीच भारी; इथं ना ऑक्सिजनचा तुटवडा, ना बेड्सची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 10:04 AM2021-04-29T10:04:28+5:302021-04-29T10:05:45+5:30

CoronaVirus News: ऑक्सिजनच्या बाबतीत नंदूरबार जिल्हा स्वयंपूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक

CoronaVirus News District Magistrate Of Nandurbar Maharashtra Rajendra Bharud Sets An Example And Makes District Oxygen Sufficient | CoronaVirus News: मानलं राव! या जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टीच भारी; इथं ना ऑक्सिजनचा तुटवडा, ना बेड्सची कमतरता

CoronaVirus News: मानलं राव! या जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टीच भारी; इथं ना ऑक्सिजनचा तुटवडा, ना बेड्सची कमतरता

googlenewsNext

नंदूरबार: औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा या सगळ्या गोष्टींची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सगळीकडे वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्यानं कोरोना रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यांमध्ये घडत असताना नंदूरबारमधील परिस्थिती मात्र पूर्णत: वेगळी आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची दूरदृष्टी आणि त्यांनी केलेलं नियोजन यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पुरेसा साठा नसल्याने लसीकरण अडचणीत; ४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद

आदिवासीबहुल अशी नंदूरबार जिल्ह्याची ओळख. गेल्या वर्षीपासून नंदूरबारनं कोरोनाशी दोन हात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जिल्ह्यात २० बेड्स होते. सध्याच्या घडीला जिल्ह्यातल्या रुग्णालयांत एकूण १ हजार २८९ बेड्स आहेत. तर कोविड केअर सेंटर्समध्ये १ हजार ११७ बेड्स आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयांत ५ हजार ६२० बेड्स उपलब्ध आहेत. शाळा, वसतिगृहं, सोसायट्या, मंदिरांनादेखील बेड्स पाठवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर ७ हजारहून अधिक आयसोलेशन बेड्स आणि १ हजार ३०० आयसीयू बेड्सदेखील जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर;देशात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सर्वात वाईट

सुरुवातीला ऑक्सिजनसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून असलेला नंदूरबार जिल्हा आज ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. संपूर्ण राज्यात, देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांच्या दूरदृष्टीमुळे नंदूरबारवर तशी वेळ आलेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, बायकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझूमदार शॉ, रेल्वे मंत्री पियूष गोयल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे अशा दिग्गजांनी डॉ. भारूड यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात नंदूरबार मॉडेल राबवण्याची घोषणा राजेश टोपेंनी केली आहे. यावरून भारूड यांच्या कार्याची प्रचिती येऊ शकेल.

देशातील 150 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता; निर्णय लवकरच

२०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. भारूड यांनी केईएम रुग्णालयातून एमबीबीएस केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असेल याचा अंदाज भारूड यांना होता. त्यामुळे डिसेंबरपासूनच त्यांनी यासाठी जिल्ह्यातली यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये गेल्या वर्षी दिवसाला सरासरी १९० कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १२०० पर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारूड यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीनं वाढून १५०० पर्यंत गेली आहे.

जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून डॉ. भारूज यांनी जिल्ह्यात ३ ऑक्सिजन प्लांट सुरू केले आहेत. इथे दर मिनिटाला ३ हजार लीटर ऑक्सिजन तयार होत आहे. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लिक्विड टँक उभारण्याचं कामदेखील सुरू आहे. कोरोना रुग्णांसाठी गेल्या ३ महिन्यांत २७ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. डॉ. भारूड यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीचं आणि केलेल्या नियोजनाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: CoronaVirus News District Magistrate Of Nandurbar Maharashtra Rajendra Bharud Sets An Example And Makes District Oxygen Sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.