शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:06 IST

'25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, येत्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल.'

मुंबई:मुंबई:लोकमततर्फे आज 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडासंबंधीत महत्वाची माहिती दिली.

सामान्यांना हक्काचे घर मिळण्याची प्रक्रिया सोपी केलीयावेळी आव्हाड म्हणाले की, आम्ही इज ऑफ डूइंग बिझनेस संदर्भात मीटिंग घेतली आणि सामान्यांना मुंबईत त्यांचे हक्काचे घर कसे मिळवता येईल, यासाठी विविध निर्णय घेतले. आमचे सरकार येण्याच्या आधी दहा वर्षात म्हाडाने फक्त दोनशे एलओेलआय दिले. पण, आमचे सरकार आल्यानंतर फक्त दोन वर्षात आम्ही 200 एलओआय दिले आहेत. याशिवाय, आम्ही फाइलींची संख्या कमी केली, म्हणजेच सामान्य व्यक्तीला घर मिळवण्यात काही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. याशिवाय, 25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आहे.  मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल. 

म्हाडाद्वारे इमारती डेव्हलप होणारते पुढे म्हणाले की, मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत कित्येक दशके जुन्या इमारती आहेत. यासाठी आम्ही कायदा केलाय, राष्ट्रपतींकडे याची फाईल आहे. त्या फाईलवर त्यांची सही होणे बाकी आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनालाही पत्र लिहीले आहे. हा कायदा आल्यानंतर आम्हाला विविध मालमत्ता कायद्याने मिळवून म्हाडाद्वारे डेव्हलप करणार आहोत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीमध्ये जवळपास पाच हजार स्केअर फुटची जागा मेडिकल फॅसेलिटीसाठी राखीव असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शिवडी-उरण परिसरात वसाहत निर्माण होणारते पुढे म्हणाले की, सध्या मुंबईत कुठेच खासगी जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत, त्यातील बहुतांश जागा म्हाडाकडे आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत, त्या वन बिल्डींग डेव्हलपमेंट बंद करणार आहोत. संपूर्ण म्हाडाला एकदाच डेव्हलप करण्याची योजना आहे. एक-एक बिल्डींग डेव्हलप करणे अवघड आहे. मुंबई आता वाढू शकत नाही, तिकडे शिवडी-उरण परिसरात खूप जमिनी आहेत. येत्या काळात तिकडे वसाहती होणार आणि कनेक्टर रोड झाल्यानंतर शिवडीवरुन मुंबईला यायला फक्त 20 मिनिटे लागणार, ही महत्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

आवास योजना सुरू करणारयावेळी आव्हाडांनी आवास योजना सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून हाउसिंग डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असायचे. मुख्यमंत्र्यांकडे इतक्या फाइल यायच्या की, हाउसिंगला वेळ मिळायचा नाही. पण, अनेक वर्षानंतर हाउसिंगला स्वतंत्र मंत्री मिळाला. मी आता लवकरच 'आवास योजना' सुरू करतोय. मुंबईतल्या झोपडपट्ट्याबाबत असलेल्या 523 योजना बंद पडल्यात, त्यांची सुरुवात करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, लवकर यावर निर्णय होऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडLokmatलोकमतMumbaiमुंबई