शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

NA मिळण्यातील हेलपाटे संपवणार; महसूलमंत्री थोरात यांचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:27 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम, आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण व पर्यटन मंत्रालयातील कार्य व एकनाथ शिंदे यांनी लागू केलेला कॉमन डीसीआर या निर्णयांचे थोरात यांनी कौतुक केले.

मुंबई : जमीन अकृषक (एनए) करण्यासाठीचा दाखला मिळवताना यापुढे नागरीकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी सुलभ पद्धत लवकरच आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये ‘महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप’ या विषयावर ते बोलत होते. 

वर्ग-२च्या जमिनी अकृषक करण्यास संबंधित प्राधिकाऱ्याकडे अर्ज करा, चालान भरा आणि एनए मिळवा इतकी सोपी पद्धत असेल. शेतकऱ्याकडे शेती किती? त्यावर पीक कोणते? त्याची स्थिती काय? अशी सगळी माहिती मोबाइलद्वाहे लाखो शेतकरी आज रोजच्या रोज अपलोड करत आहेत.  त्या माध्यमातून राज्यात कोणते पीक मुबलक येत आहे व कोणत्या पिकाचा तुटवडा भासणार आहे, याचा नेमका अंदाज सरकारला लवकरच बांधता येईल. यामुळे कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीबाबत धोरण ठरवणे सोपे होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले की, इन्फ्रा परिषदेत महसूलमंत्र्यांचे काय काम, असा प्रश्न काहींच्या मनात असेल; परंतु विजय दर्डा यांना माहीत आहे की, महसूल खात्याखेरीज विकास होत नाही. थोरात यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. तुम्ही उभा राहिलेला पूल पाहिला; पण पुलाखालची जमीन पाहिली नाही. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टी कार्ड पाहिले नाही. आम्हाला (महसूल) वजा केले, तर काहीच नाही. ज्या जमिनीवर इन्फ्रास्ट्रक्चर उभे आहे ती आमचीच आहे. थोरात यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.रेडीरेकनरचे दर हे यापूर्वी वाढत होते. आता जेथे दर कमी झाले तेथील रेडीरेकनर दर सरकारने कमी केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जमीन मोजणीची पद्धत सोपी व्हावी याकरिता रोअर यंत्राचा वापर केला जाणार असून, त्यामुळे जमीन मोजणी एका तासात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लिव्ह लायसन्स, मॉर्गेज रजिस्ट्रेशन यासारख्या कामांकरिता रजिस्ट्रेशन कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करीत आहोत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम, आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण व पर्यटन मंत्रालयातील कार्य व एकनाथ शिंदे यांनी लागू केलेला कॉमन डीसीआर या निर्णयांचे थोरात यांनी कौतुक केले. कमी काळात उभ्या राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे डॉक्युमेंटेशन करण्याची सूचना त्यांनी केली.

ऑनलाइन सातबाराचा उतारा देताना अनावश्यक बाबी काढून टाकल्या व त्याचे मोफत वाटप केले. फेरफार ऑनलाइन मिळत असल्याने लोकांचे हेलपाटे वाचले आहेत. १ ऑगस्टपासून एक कोटी २५ लाख खाते उतारे लोकांनी डाऊनलोड केले आहेत. - बाळासाहेब थोरात

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात