शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Tokyo Olympics: महिला हॉकी संघ अर्जेंटिनाला नमविणार? अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:18 IST

Indian Women's hockey team: ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल.

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल. याआधी १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली.भारतीय महिलांनी सोमवारी धक्कादायक विजय मिळवताना तीन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असे नमवत पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र आता ते कांस्यपदकासाठी खेळतील. त्यामुळे आता सुवर्णपदकासाठी भारतीयांच्या सर्व आशा महिला हॉकी संघावर टिकल्या आहेत.ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी जागतिक क्रमवारीत सातवे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. गोलरक्षक सविताच्या नेतृत्वात भारताच्या बचावफळीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळ केला.केवळ एका गोलने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत भारतीयांनी जबरदस्त संरक्षण केले. त्यामुळे आता भारताला पदक मिळवून देण्यासाठी या बचावफळीवर मोठी जबाबदारी असेल. 

आत्मविश्वास उंचावलाअर्जेंटिनाच्या महिला संघाने सिडनी २००० आणि लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. मात्र, अद्याप त्यांना सुवर्ण पटकावता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण ताकदीने खेळ होईल, यात शंका नाही. पहिले तीन सामने गमावल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारली. 

भारताचा सुवर्ण स्वप्नभंग... भारतीय पुरुष हाॅकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न मंगळवारी बेल्जियमकडून उपांत्य सामन्यात ५-२ ने झालेल्या पराभवासह भंगले. कांस्यपदकाची अपेक्षा मात्र अद्याप कायम असून, भारताला जर्मनीविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी सामना खेळावा लागणार आहे.सामन्यात एकवेळ भारत आघाडीवर होता; मात्र अखेरच्या ११ मिनिटांत तीन गोल गमावणे तसेच अलेक्झांडर हेंड्रिक्स (१९, ४९ आणि ५३ व्या मिनिटाला)याने नोंदविलेली हॅट्‌ट्रिक या दोन बाबी महागड्या ठरल्या. विश्वविजेत्या बेल्जियमकडून हेंड्रिक्सशिवाय फॅनी लयपर्टने दुसऱ्या आणि जॉनडोहमेनने ६० व्या मिनिटाला गोल केला. भारताकडून हरमनप्रीतसिंग याने सातव्या आणि मनदीपसिंगने आठव्या मिनिटाला गोल केला. बेल्जियम संघ रिओ ऑलिम्पिकचा रौप्य विजेता असून, आज दुसऱ्यांदा त्यांनी ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. 

भारताने दिले १४ पेनल्टी कॉर्नर...आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एकेकाळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या संघाला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते; मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. पराभवासाठी भारतीय संघ स्वत: दोषी ठरला. हेंड्रिक्स आणि लयपर्ट हे पेनल्टी तज्ज्ञ असल्याने भारताच्या डीमध्ये शिरून पेनल्टी कॉर्नर मिळवणे ही प्रतिस्पर्धी संघाची रणनीती होती. त्यात ते यशस्वी झाले. बेल्जियमला एकापाठोपाठ १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यात पाचपैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यापैकी केवळ एकावर गोल होऊ शकला.

 १९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक स्पेनला ४-३ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते; पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. त्याआधी १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताचा ०-२ ने पराभव झाला होता. 

टॅग्स :Hockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021