शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 02:04 IST

गुडघादुखीने त्रस्त झाल्याने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघातील बचावपटू सुनीता लाक्रा हिने गुडघ्याच्या दुखापतीला कंटाळून आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली. सुनीता २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य विजेत्या भारतीय संघाची खेळाडू होती. दुखापतीमुळे दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागल्याचे सुनीताने सांगितले.निवृत्तीची घोषणा केल्यामुळे २८ वर्षांच्या सुनीताचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता म्हणाली,‘आज माझ्यासाठी भावनिक क्षण असून मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहे.’ सुनीता २००८ पासून भारतीय संघात आहे. यादरम्यान तिने संघाचे नेतृत्वदेखील केले. भारतासाठी १३९ सामने खेळलेली सुनीता २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेत्या भारतीय संघाची खेळाडू होती. तीन दशकानंतर पहिल्यांदा पात्र ठरलेल्या भारतीय संघातून सुनीता रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. मात्र टोकियो ऑलिम्पिकचे तिचे स्वप्न गुडघेदुखीमुळे भंगले. सुनीता पुढे म्हणाली, ‘काही दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. यातून सावरण्यास किती वेळ लागेल, हे निश्चित नाही. शस्त्रक्रियेनंतर मात्र मी स्थानिक हॉकीत खेळणे सुरू ठेवणार आहे. मला नोकरी दिलेल्या संघासाठी मी नियमित खेळणार आहे.’ सुनीताने यावेळी सहकारी खेळाडू, हॉकी इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांचे आभार मानले आहेत. (वृत्तसंस्था)तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघातून खेळण्याचे भाग्य मला लाभले. मात्र आता गुडघादुखीमुळे पुढील ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले. आता आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने या दुखापतीतून कधीपर्यंत सावरेन याची कल्पना नाही.- सुनीता लाक्रा

टॅग्स :Hockeyहॉकी