शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लॉकडाऊनदरम्यान प्रेरणादायी पुस्तकांचा होता आधार- पीआर श्रीजेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:41 PM

स्वत:ला प्रेरित करण्यासाठी या कालावधीत ‘प्रेरणादायी पुस्तके वाचली.’

नवी दिल्ली : स्वगृही परतल्यानंतरही भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश आताच बाहेर जाऊ शकत नाही; पण त्याची काही तक्रार नाही, कारण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत नाही. दोनवेळचा आॅलिम्पियन श्रीजेश म्हणाला, कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाऊनदरम्यान दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) बेंगळुरूतील केंद्रात घालविल्यामुळे माझ्यासह अन्य अनेक खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य ढासळत होते. त्यामुळे स्वत:ला प्रेरित करण्यासाठी या कालावधीत ‘प्रेरणादायी पुस्तके वाचली.’श्रीजेश कोच्ची येथील आपल्या निवासस्थानावरून बोलताना म्हणाला, ‘हा खडतर कालावधी होता, कारण आमची जीवनशैली पूर्णपणे बदलली होती. आपल्या विचारांचा समतोल राखणे ही सर्वात महत्त्वाची बाब होती. माझे वडील हार्ट पेशंट आहेत आणि मला दोन अपत्य आहेत (सहा वर्षांची मुलगी व तीन वर्षांचा मुलगा). त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक चिंतित होतो, कारण दोन्ही अधिक जोखीम असलेल्या वयोगटातील आहेत.३२ वर्षीय श्रीजेशने कबूल केले की, लॉकडाऊनदरम्यान नकारात्मक विचार दूर ठेवणे कठीण होते. पण अमेरिकन ट्रायथ्लॉनपटू जोआना जीगरचे ‘द चॅम्पियन मार्इंडसेट-अँड अ‍ॅथ्लिट््स गाईड टू मेंटल टफनेस’ हे पुस्तक वाचून मानसिक कणखरता राखता आली.श्रीजेश पुढे म्हणाला, ‘एका बाजूला मला घराची आठवण येत होती तर दुसऱ्या बाजूला तेथे जाऊन कुटुंबीयांना अडचणीत आणू इच्छित नव्हतो. कारण प्रवासा दरम्यान व्हायरसची लागण होण्याचा धोका होता. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी मी पुस्तकांचा आधार घेतला. लॉकडाऊनदरम्यान मी अनेक पुस्तके वाचली. त्यात फिक्शन, नॉन फिक्शनपासून प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश होता. त्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्यास मदत झाली. चॅम्पियन मार्इंडसेट असे पुस्तक आहे की मी ते दोनदा वाचले.’भारताचे पुरुष व महिला हॉकी संघ २५ मार्चपासून भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) बेंगळुरू येथील दक्षिण केंद्रात होते. त्यावेळी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती.गेल्या शुक्रवारी हॉकीपटूंना एक महिन्याचा ब्रेक मिळाला असून, त्यांना केंद्रातून जाण्याची परवानगी मिळाली.श्रीजेश १४ दिवसांसाठी आता आपल्या घरी विलगीकरणात आहे. त्यानंतर त्याला आपल्या अपत्यांसोबत खेळता येईल व घराबाहेर पडता येईल. टोकियोमध्ये आपल्या कारकिर्दीतील तिसरे आॅलिम्पिक खेळणार असलेला श्रीजेश कारकिर्दीचा शेवट आॅलिम्पिक पदकासह करण्यास उत्सुक आहे.(वृत्तसंस्था)>‘टोकियो माझे कदाचित अखेरचे आॅलिम्पिक असू शकते, पण मी नेहमी छोट्या लक्ष्याला प्राथमिकता देतो. आॅलिम्पिक पदक निश्चितच माझे लक्ष्य आहे. एक आॅलिम्पिक खेळून पदक जिंकणे तीन आॅलिम्पिक खेळ व रिकाम्या हाताने परतण्यापेक्षा चांगले आहे.’-पीआर श्रीजेश