शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे जेतेपद; लक्ष्य टोकियो 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:55 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली.

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग ( 7 मिनिट), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा ( 22 मि.), गुरसाहीबजीत सिंग ( 26 मि.) आणि मनदीप सिंग ( 27 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. राऊंड रॉबीनमध्ये न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने भारताला पराभूत केले होते.

''आम्ही दमदार खेळ केला. सामन्यात मिळालेल्या संधीवर गोल करण्यात आम्ही यशस्वी ठरलो,''असे मत हरमनप्रीतने व्यक्त केले. तो म्हणाला,''अंतिम सामना हा आव्हानात्मकच असतो. राऊंड रॉबीनमध्ये आम्ही न्यूझीलंडकडून हरलो होतो. मात्र, त्या सामन्यातील चुकांवर आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि त्याचे फळ मिळाले.'' 

दोन्ही संघांना मैदानाच्या मध्यरेषेवरच अधिक खेळ करण्यावर भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरले. मात्र, कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली. न्यूझीलंडकडून पलटवार झाला, परंतु भारताची बचावफळीही तितकीच तगडी होती. शमशेरने 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताची आघाडी 2-0ने मजबूत केली. दुसऱ्या सत्रात किवींच्या खेळाडूंना केवळ दोनदाच भारताच्या वर्तुळात प्रवेश करता आला. याच दरम्यान भारताने तीनवेळा किवींच्या वर्तुळात आगेकूच केली. 22व्या मिनिटाला गुरसाहीबजीत आणि मनदीपच्या पासवर निलकांताने गोल केला.  त्यानंतर गुरसाहीबजीत आणि मनदीप यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.  या विजयानंतर भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीकडे लागले आहे. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पात्रता स्पर्धा होणार आहे. 

टॅग्स :HockeyहॉकीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020IndiaभारतNew Zealandन्यूझीलंड