शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

भारतीय संघाला जकार्ता मार्गे टोकियोची सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:17 IST

भारतीय पुरुष संघाने २०१४ इंचॉनमध्ये कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान संघाला पराभूत करून, तब्बल १६ वर्षांनी आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदक जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता. सुवर्णपदकासह आपण ‘२०१६ रिओ आॅलिम्पिक’साठी सुद्धा पात्र ठरलो होतो.

- धनराज पिल्लेभारतीय पुरुष संघाने २०१४ इंचॉनमध्ये कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान संघाला पराभूत करून, तब्बल १६ वर्षांनी आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदक जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता. सुवर्णपदकासह आपण ‘२०१६ रिओ आॅलिम्पिक’साठी सुद्धा पात्र ठरलो होतो. आशियाई क्रीडामध्येहॉकीचे सुवर्णपदक अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते; कारण विजेता संघाकडे आशियाई खंडाचा राजा म्हणून बघितले जाते, शिवाय पुढच्या आॅलिम्पिक स्पर्धेला तो संघ पात्रसुद्धा ठरतो. २००६ कतार आशियाई क्रीडामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ही स्पर्धा सहज घेतल्यामुळे पदक तर राहिलेच; पण २००८ बीजिंग आॅलिम्पिकला पात्रसुद्धा ठरला नाही. आठवेळा आॅलिम्पिक चॅम्पियन असणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी तो काळा दिवसच. २०१० गुंगझोऊ आशियाई क्रीडामध्ये कांस्यपदक प्राप्त केले; पण पात्रता फेरी जिंकू न २०१२ लंडन आॅलिम्पिक गाठता आले. पात्रता फेरी खेळण्याचे ओझे व दुखणे भारतीय हॉकी संघाला चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे जकार्ता आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ मैदानावर उतरेल.२००८ पासून भारतीय हॉकीने नेहमीच परदेशी कोचला पसंती दिली आहे, परंतु मे २०१८ मध्ये भारताचे हरेंद्र सिंग यांनी प्रशिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन निडर हॉकीची सुरुवात दिसत आहे? आणि भारतीय संघ उत्तम खेळत आहे. पी. आर. श्रीजीश प्रेरणादायी कर्णधार आहेच; पण त्याच्या व्यतिरिक्त, जगातील सर्वाेत्कृष्ट गोलरक्षक म्हणूनसुद्धा ओळखला जातो. डिफेन्समध्ये रुपिंदरपाल, बिरेंद्र लाकरा यांचा अनुभव तर आहेच, तरीसुद्धा २२ वर्षीय हरमनप्रीत भारताचा स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातोय. हरमनप्रीत अत्यंत वेगाने ड्रॅग फ्लिक करतो व पेनल्टी कॉर्नर एक्स्पर्ट म्हणून आपली छाप जगावर सोडत आहे. मिडफिल्डमध्ये मनप्रीत सिंग, सरदार सिंग, चिंगलेनसाना सारखे दिग्गज असल्यामुळे फॉरवर्डसला बरोबर वेळी चेंडू मिळतो आणि गोल करण्याचे शक्यता वाढतात. युवा फॉरवर्डस आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय, मंदीप सिंग आपल्या गतीने विरोधी संघाची झोप उडवतात. ‘भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या अगदी योग्य मार्गावर आहे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नक्कीच परत एकदा सुवर्णपदक जिंकेल, अशी खात्री आहे.’ (शब्दांकन : अभिजित देशमुख)महिला संघालासुद्धा सुवर्णवेधाची संधीपुरुष संघासारखीच सुवर्णसंधी भारतीय महिला संघाला सुद्धा मिळणार आहे. यंदाच्या महिला विश्वकपमध्ये चीन, जपान महिला संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. आशिया संघामधून भारत आणि दक्षिण कोरिया महिला संघाने बादफेरीत धडक मारली. त्यामुळे भारतीय महिलासुद्धा सुवर्ण पदकच्या प्रबळ दावेदार आहेत. आशियाई क्रीडामध्ये महिला संघाने १९८२ मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते आणि नेहमीच उपांत्य फेरी गाठली आहे. राणी रामपाल आणि सविता पुनियाकडून सर्वांत जास्त अपेक्षा आहे. ‘२०१४ आशियाई क्रीडामध्ये महिला संघानेसुद्धा कांस्यपदक पटकवलं आणि यंदा सुवर्णपदक प्राप्त करू शकतील. महिला संघाने मॅच-बाय-मॅच धोरण आखले आणि प्रत्येक मॅच संयमाने खेळावी.’ विश्वचषकमध्ये चांगल्या कामगिरीनंतर भारतीय महिला संघ आशियाई क्रीडामध्ये उपांत्य फेरी सहज गाठू शकेल.भारतीय संघाचे साखळी सामनेपुरुष संघाचे सामने२२ आॅगस्ट : भारत वि. हाँगकाँग२४ आॅगस्ट : भारत वि. जपान२६ आॅगस्ट : भारत वि. द. कोरिया२८ आॅगस्ट : भारत वि. श्रीलंकामहिला संघाचे सामने१९ आॅगस्ट : भारत वि. इंडोनेशिया२१ आॅगस्ट : भारत वि. कझाकिस्तान२५ आॅगस्ट : भारत वि. द. कोरिया२७ आॅगस्ट : भारत वि. थायलंडभारतीय संघपुरुष : गोलरक्षक - श्रीजेश (कर्णधार), क्रिशन पाठक; डिफेंडर - हरमनप्रीतसिंग, वरुणकुमार, सुरेंदरकुमार, वीरेंद्र लाक्रा; मिडफिल्डर - सरदारसिंग, मनप्रीतसिंग, चिंगलेनसानसिंग, विवेक सागरप्रसाद, सिमरनजितसिंग; फॉरवर्ड्स - एस. व्ही. सुनील, मनदीपसिंग, आकाशदीपसिंग, दिलप्रीतसिंग, ललितकुमार उपाध्याय. प्रशिक्षक - हरेंद्रसिंगमहिला : गोलरक्षक - सविता, राजानी; डिफेंडर- दीपिका, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, गुरजितकौर, रिना खोखर; मिडफिल्डर - मोनिका, निमता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, नवज्योतकौर; फॉरवर्ड्स - राणी (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, उदिता; मुख्य प्रशिक्षक - शोर्द मरीन.14आशियाई क्रीडा हॉकीमध्ये भारतीय पुरुष व महिलाने एकूण जिंकलेले पदके3भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडामध्ये जिंकलेले सुवर्णपदक ( १९६६, १९९८,२०१४)8 भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडामध्ये जिंकलेले रौप्यपदक2 भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडामध्ये जिंकलेले कांस्यपदक20 भारतीय पुरुष हॉकी संघाने २०१४ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत ६ सामन्यांतील गोल1 आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकी संघाने १९८२ मध्ये सुवर्ण जिंकले1भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडामध्ये जिंकलेले रौप्यपदक3भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडामध्ये जिंकलेले कांस्यपदक

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा