शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भारताने अमेरिकेचा पाडला फडशा, २२ गोलचा वर्षाव करत एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:13 IST

जोहोर बहरु (मलेशिया) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा भारतीय हॉकी पुरुष संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत तिसरा विजय मिळवताना अमेरिका संघाचा २२-० असा एकतर्फी फडशा पाडला.

जोहोर बहरु (मलेशिया) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा भारतीय हॉकी पुरुष संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत तिसरा विजय मिळवताना अमेरिका संघाचा २२-० असा एकतर्फी फडशा पाडला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय युवांच्या धडाक्यापुढे अमेरिकेचा सहज धुव्वा उडाला. विशेष म्हणजे भारताच्या गोलरक्षकाचा अपवाद सोडता सर्व खेळाडूंनी गोल करत उत्कृष्ट सांघिक खेळ करताना अमेरिकेला लोळवले.तमान दया हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने गोलचा वर्षाव करताना अमेरिकेला चांगलेच धुतले. स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवलेल्या भारताने याआधी रविवारी जपानला ३-२, तर यानंतर मलेशियाला २-१ असे नमवले. या दिमाखदार विजयानंतर भारताची गोलसरासरी अत्यंत मजबूत झाली असून गुणतालिकेत भारताने सर्वाधिक ९ गुणांसह अव्वल स्थानही मजबूत केले आहे. पहिल्याच क्वार्टरमध्ये चार गोल नोंदवत भारताने सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते. यानंतर पुन्हा एकदा आपला धडाका कायम राखताना भारताने दुसºया क्वार्टरमध्येही ४ गोल करत ८-० अशी भक्कम आघाडी घेत अमेरिकेचे मानसिक खच्चीकरण केले. तिसºया क्वार्टरमध्ये मात्र भारतीय संघाने तुफान हल्ले करताना तब्बल ९ गोल नोंदवत अमेरिकेच्या अननुभवी युवा खेळाडूंना हॉकीचे धडेच दिले, तर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने ५ गोल नोंदवत दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.>हरमनजित सिंग याने सर्वाधिक ५ गोल करताना सामन्यात छाप पाडली. त्याने २५व्या, २६व्या, ४०व्या, ४५व्या आणि ५२व्या मिनिटाला गोल केले. अभिषेकने (२८, ३७, ३८, ४५) चार गोल, विशाल अंतिल (२, ३०, ४४) आणि दिलप्रीत सिंगने (३, ५४, ५९) यांनी प्रत्येकी तीन गोल, तर मनिंदर सिंगने (४२, ४३) दोन गोल नोंदवले. त्याचप्रमाणे प्रताप लाक्रा (२), रविचंद्र मोइरंगथेम (७), रौशन कुमार (३७), शिलालंद लाक्रा (४७) आणि विवेक प्रसाद (४८) यांनीही वाहत्या गंगेत हात धुताना प्रत्येकी एक गोल करत अमेरिकेचा धुव्वा उडवला.

टॅग्स :Hockeyहॉकी