शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चित्तथरारक लढतीत भारताची बेल्जियमवर मात, भारत वर्ल्ड हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:53 IST

अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.  स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ३-२ अशा फरकाने मात दिली.  

भुवनेश्वर  - अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.  स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ३-२ अशा फरकाने मात दिली.  निर्धारीत वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर सामना शूटआऊटमध्ये पोहोलचला. पण शूटआऊटमध्येही २-२ अशी बरोबरी झाली. त्यानंतर हरमनप्रीतने गोल करून भारताला ३-२ अशी आधाडी मिळवून दिली. तर आकाश चिकटेने अप्रतिम बचाव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेनुरूप झाली नव्हती.  त्यामुळे आज बलाढ्य बेल्जियमविरुद्धच्या लढतीत खेळ उंचावण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते. दरम्यान, या लढतीती सुरुवातीपासूनच अटीतटीचा खेळ झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाना गोल करता न आल्याने गोलफलक गोलशून्य बरोबरी दाखवत होता. अखेर ३१ व्या मिनिटाला ही कोंडी फोडताना गुरजंत सिंगने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ३६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करून ही आघाडी २-० अशी वाढवली. भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे असे वाटत असतानाच ३९ व्या मिनिटाला बेल्जियमच्या लॉईल लुओपार्ट याने गोल केला. त्यानंतर ४६ व्या मिनिटाला लॉईल लुओपार्टने पुन्हा एकदा गोल करून बेल्जियमला बरोबरी साधून दिली. मात्र लगेचच रुपिंदरपाल सिंग याने गोल करून भारताला पुन्हा आघाडीवर नेले. पण सेड्रिक चार्लियरने बेल्जियमसाठी तिसरा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता न अल्याने सामना शूटआऊटमध्ये पोहोचला. 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडाIndiaभारत