शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Hockey World Cup 2018 : चांगला खेळ करुनही पाकिस्तानच्या वाट्याला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 8:24 PM

Hockey World Cup 2018: जर्मन संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले.

ठळक मुद्देजर्मन संघाने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केलेमार्को मिल्टकाऊने केला एकमेव गोलपाकिस्तानने बरोबरीच्या संधी गमावल्या

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : जर्मन संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. पाकिस्तानने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनीला एका गोलवर समाधान मानण्यास भाग पाडून अन्य संघांना धोक्याचा इशाराच दिला आहे. पाकिस्तानला बरोबरीच्या संधी चालूनही आल्या होत्या, परंतु समन्वयाच्या अभावामुळे त्यांना हार मानावी लागली. 'D' गटातील आजच्या दुसऱ्या सामन्यात चुरशीचा खेळ पाहण्याची उत्सुकता होती. पाचवेळा विश्वचषक उंचावलेला पाकिस्तानचा संघ सलामीच्या लढतीत बलाढ्य जर्मनीचा सामना करायला उतरला होता. त्यामुळे गोलचा पाऊस पडण्याची अपेक्षा केली जात होती, परंतु दोन्ही संघांनी बचावावरच अधिक भर दिला. विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा समोरासमोर आलेल्या पाकिस्तान आणि जर्मनीने प्रत्येकी एकेक विजय मिळवले होते. जागतिक क्रमवारीत जर्मनी सहाव्या, तर पाकिस्तान 13व्या स्थानावर आहे. मध्यंतरानंतरचा खेळ अधिक रोमांचक होत गेला. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांनी सामन्याचा वेग अधिक वाढला. जर्मन संघाची बचावभिंत भेदण्यात पाकिस्तानला सातत्याने अपयश येत होते. 36 व्या मिनिटाला मार्को मिल्टकाऊने अप्रतिम मैदानी गोल करताना जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्ताननेही तोडीस तोड खेळ केला, परंतु त्यांना चालून आलेल्या सोप्या संधीचं सोनं करता आलं नाही. 41 व्या मिनिटाला जर्मनीला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर त्यांना गोल करता आला नाही. चेंडूवर नियंत्रण राखण्यात पाकिस्तानी खेळाडूंना अपयश येत होते.शेवटच्या सत्रात सातत्याने प्रयत्न करूनही पाकिस्तानला बरोबरीचा गोल करता आला नाही. त्यांना सलामीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाPakistanपाकिस्तानGermanyजर्मनी