शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:11 IST

गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली.

मारलो : गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली.भारतीय संघ ०-१ गोलने पिछाडीवर पडला होता; परंतु त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त मुसंडी मारताना शर्मिला देवी आणि गुरजित यांच्या गोलच्या बळावर विजय मिळविला.पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंनी गोल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला; परंतु त्यात यश मिळाले नाही. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सामन्यात वर्चस्व राखताना दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले; परंतु प्रतिस्पर्धी संघाची गोलरक्षक मॅडी हिंच हिने त्याचा शानदार बचाव केला.ग्रेट ब्रिटनने आणखी एका सुरेख संधीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय गोलरक्षक सविता पुनिया हिने त्यांच्या आशेवर पाणी फेरताना त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे पहिला हाफ गोलरहित राहिला.अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पहिल्याच मिनिटाला ग्रेट ब्रिटनच्या एमिली डेनफ्रोडने संधीचा फायदा घेताना ४६ व्या मिनिटाला आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढविला आणि त्याचे फळ संघाला लगेच मिळाले. शर्मिलाने केलेल्या गोलच्या बळावर भारताने १-१ अशी बरोबरी साधली.सामना अनिर्णीत राहणार अशीच चिन्हे होती; परंतु सामना संपण्यास अवघे ४८ सेकंद बाकी असताना भारताने शॉर्ट कॉर्नर मिळविला आणि याचे गुरजितने गोलमध्ये रूपांतर करीत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा सामना आज, रविवारी खेळविला जाणार आहे.भारताची स्पेनवर ६-१ ने मातएंटवर्प (बेल्जियम) : भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली शानदार कामगिरी सुरुच ठेवत शनिवारी स्पेनला ६-१ अशा गोलफरकाने पराभूत केले. हरमनप्रित सिंगने दोन गोल केले.हरमनप्रितशिवाय मनप्रित सिंग, निलकंठ शर्मा, मनदीप सिंग व रुपिंदरपाल सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी स्पेनवर वर्चस्व राखले. मध्यंतरापर्यंत भारताकडे २ - १ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही आक्रमक खेळ करत विजय मिळवला. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत