शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हॉकी : मनप्रीतकडे भारताची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:50 IST

मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल.

नवी दिल्ली - मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल.हॉकी इंडियाने बुधवारी १८ सदस्यांचा संघ जाहीर केला असून, १८ आॅक्टोबरपासून स्पर्धेचे आयोजन होणार आहे. भारतीय संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणार असून, २०१६ मध्ये मलेशियातील कौंटन येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ३-२ ने पराभव केला होता. चिग्लेनसानासिंग याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले. गोलकीपर म्हणून श्रीजेशसह युवा कृष्ण बहादूर पाठक याचीही संघात निवड झाली आहे. बचाव फळीत कोथाजितसिंग याचे पुनरागमन झाले. हरमनप्रीत, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, सुरेंद्र कुमार आणि जर्मनप्रीतसिंग यांचा समावेश असलेल्या बचाव फळीत २० वर्षांचा हार्दिकसिंगला पहिल्यांदा स्थान मिळाले.यंदा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला मनप्रीत मधल्या फळीत चिग्लेनसानासिंग याच्यासोबत असेल. भारतीय संघ तीन आठवडे भुवनेश्वर येथे सराव करणार आहे. त्यानंतर संघ स्पर्धेसाठी रवाना होईल. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताला स्पर्धेत मलेशिया, पाकिस्तान, द. कोरिया,जपान आणि यजमान ओमानविरुद्ध राऊंडरॉबिन सामने खेळावे लागतील.‘१८ सदस्यांच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. विश्व चषकाआधी काही खेळाडूंना पारखण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आशियाडमधील कटू अनुभव विसरून आमचे खेळाडू डावपेचानुसार खेळतील आणि ओमानमध्ये पुन्हा विजेते होतील, असा विश्वास आहे,’ असे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)भारतीय हॉकी संघगोलकीपर : पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. बचाव फळी : हरमनप्रीत सिंग, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, कोथाजितसिंग, सुरेंद्र कुमार, जर्मनप्रीतसिंग, हार्दिकसिंग. मधली फळी : मनप्रीतसिंग (कर्णधार), सुमित नीलकांत शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिग्लेनसानासिंग, (उपकर्णधार). आक्रमक फळी : आकाशदीपसिंग, गुरजंतसिंग, मंदीपसिंग आणि दिलप्रीतसिंग.

टॅग्स :Hockeyहॉकीnewsबातम्या