शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:25 IST

हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे.

नवी दिल्ली : हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे. या भूमिकेसाठी आपण ‘फिट’ असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.२००९ ते २०११ या कालावधीत सिनियर पुरुष संघाचे कोच राहिलेले हरेंद्रसिंग यांनी आपण विदेशी प्रशिक्षकाच्या तुलनेत तसुभरही कमी नसल्याचा देखील दावा केला. हॉकी इंडिया माझ्या अर्जाकडे डोळेझाक करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.‘होय मी निश्चितपणे अर्ज करणार आहे. पूर्ण तयारीनिशी अर्ज सोपविणार असून देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन देतो. माझ्याकडे कोचिंगचा २१ वर्षांचा अनुभव आहे. २०२० चे प्लॅनिंगदेखील सादर करणार आहे. मी देशभक्त असल्याने स्पर्धेत पदक जिंकणे हेच लक्ष्य असते, असे हरेंद्र यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.विदेशी कोचला येथील परिस्थिती आणि खेळाडूची माहिती नसल्याने शून्यापासून सुरुवात करावी लागेल. मी या खेळाडूंना चांगल्या तºहेने ओळखतो, असे हरेंद्र यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.कोचचे पद मिळण्याबाबत आपण किती आश्वस्त आहात, असा सवाल करताच हरेंद्र म्हणाले,‘हॉकी इंडिया आता माझ्याकडे डोळेझाक करू शकणार नाही. आघाडीच्या कोचेसमध्ये माझे नाव असल्याने मी रिकी चाल्सवर्थ यांचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही विदेशी कोचच्या हाताखाली काम करणार नाही, हे देखील स्पष्ट करू इच्छितो. ज्युनियर विश्वचषक विजेत्या कोचने अर्ज केल्यास दावेदार असेल असे संकेत हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी दिल्यामुळे हरेंद्र हेच मुख्य कोच बनण्याची शक्यता बळावली आहे.(वृत्तसंस्था)नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज४रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर हॉकी इंडियाने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी नव्या कोचचा शोध सुरू केला आहे. स्वत:च्या वेबसाईटवर हॉकी इंडियाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. बीसीसीआयच्या धर्तीवर हॉकी इंडियाने प्रथम जाहिरात दिली.जाहिरातीनुसार मुख्य कोचची नियुक्ती २०२० च्या टोकियो आलिम्पिकपर्यंत असेल. कोचचे काम समाधानकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी सहा महिन्यांचा परिविक्षाधिन(प्रोबेशन) कालावधी दिला जाईल. मुख्य कोच हा हॉकी इंडियाचे हाय परफॉमर्न्स संचालक डेव्हिड जॉन, सीईओ अ‍ॅलेना नॉर्मन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई)जबाबदार असेल. २०१८ ला आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन होणार असून या स्पर्धेतील संघाच्या कामगिरीची जबाबदारीदेखील नव्या कोचवरच असेल. मुख्य कोच हा ज्युनियर संघाचा विकास आणि तयारीवर लक्ष ठेवणार आहे. संघ व्यवस्थापनाकडे प्रगती अहवाल नियमितपणे सादर करावा लागेल. जाहिरातीनुसार इच्छुकांकडे आंतरराष्टÑीय महासंघाच्या हाय परफॉमर्न्स कोचिंगमधील लेव्हल-३ असायला हवे शिवाय आंतरराष्टÑीय स्तरावर त्याची कामगिरी उच्चस्तरीय असायला हवी. अन्य आंतरराष्टÑीय संघांबाबत माहिती कोचला असायला हवी. खेळाडू, कोचेस आणि स्टाफ यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देण्याची गुणवत्ता त्याच्या व्यक्तिमत्त्वात असायला हवी. योग्य उमेदवाराने स्वत:चा अर्ज ई मेलद्वारे १५ सप्टेंबरपर्यंत हॉकी इंडियाच्या सीईओकडे द्यायचा आहे.