शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Hockey Champions Trophy : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टीत भारताचं शूटआऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 21:19 IST

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने ३-१(१-१) असा विजय मिळवत जेतेपद राखले.

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने ३-१(१-१) असा विजय मिळवत जेतेपद राखले.

सामन्यात सर्वाधिक कॉर्नर मिळूनही समन्वयातील गफलतीमुळे भारतीय खेळाडूंना पहिल्या तीन सत्रात एकही गोल करता आला नाही. याउलट ऑस्ट्रेलियाने पहिल्याच कॉर्नरवर अचूक गोल करून २४ व्या मिनिटाला आघाडी घेतली. ब्लॅक गोव्हर्सने टोलावलेला तो चेंडू गोलरक्षक पी आर श्रीजेशला अडवता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली होती. 

भारताने त्यानंतर बचावातील त्रूटी त्वरीत दूर करताना ऑस्ट्रेलियाला  गोल खात्यात अधिक भर करण्यापासून रोखले. श्रीजेशने पुन्हा एकदा काही अप्रतिम बचाव केले. भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना ऑस्ट्रेलियाच्या बचावक्षेत्रात चढाई केली. ४२ व्या मिनिटाला भारताला त्यांचा बचाव भेदण्यात यश आले. चिंग्लेनसानाच्या पासवर विवेक सागरने भारतासाठी बरोबरीचा गोल केला. त्यामुळे अखेरच्या पाच मिनिटांत अधिक रंजक खेळ झाला. ऑस्ट्रेलियाने सातत्याने भारताच्या पेनल्टी क्षेत्रावर चढाई केली. ५४ व्या मिनिटाला दिलप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या पेनल्टी क्षेत्रावर खोलवर चेंडू नेला, परंतु त्याला गोल करता आला नाही. ५७व्या मिनिटाला मनप्रीतला गोलजाळीनजीक असलेला चेंडू गोलमध्ये रुपांतरीत करता आला नाही. त्यामुळे निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरीच राहिली.    

त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आली. त्यातही भारताकडून सुरुवातीचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, श्रीजेशने दोन  अप्रतिम बचाव करत सामना रोमांचक अवस्थेत कायम ठेवला. परंतु ऑस्ट्रेलियाने ३-१(१-१) अशी बाजी मारली.

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडाIndiaभारत