शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भारताला जर्मनीचे कडवे आव्हान, ज्युनियर हॉकी विश्वचषकाची उपांत्य लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 08:22 IST

Junior Hockey World Cup: गतविजेत्या भारतापुढे एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी सहावेळेचा चॅम्पियन जर्मनीचे कडवे आव्हान असेल. विजयासाठी भारतीय संघातील बचावफळी आणि ड्रॅग फ्लिकर खेळाडू यांना मेहनत घ्यावी लागेल.

भुवनेश्वर : गतविजेत्या भारतापुढे एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी सहावेळेचा चॅम्पियन जर्मनीचे कडवे आव्हान असेल. विजयासाठी भारतीय संघातील बचावफळी आणि ड्रॅग फ्लिकर खेळाडू यांना मेहनत घ्यावी लागेल.स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सकडून ४-५ने पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताने पुढचे तीनही सामने शानदार कामगिरीच्या बळावर जिंकून सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक दिली आहे.  भारताने उपांत्यपूर्व सामन्यात काल बेल्जियमचा १-० ने पराभव केला.  यशदीप सिवाच, उपकर्णधार संजय कुमार आणि  शारदानंद तिवारी यांच्या बचावफळीने सामन्यात शानदार कामगिरी केली. भारताचे दोन्ही गोलकीपर प्रशांत चौहान आणि पवन यांनी बेल्जियमचे अनेक हल्ले परतवून लावले होते. संजय, तिवारी, अरिजित हुंडल आणि अभिषेक लाक्रा हे चार पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आहेत.  संजयने फ्रान्स आणि पोलंडविरुद्ध पाठोपाठ हॅटट्रिक नोंदविली. भारतीय संघाचे मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी आमचे खेळाडू शांतचित्त खेळत असून त्यांचे थंड डोक्याने खेळणे हेच यशाचे गमक असल्याचे म्हटले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या भारतीय संघाचा खेळाडू राहिलेला विवेक सागर प्रसाद हा संघाचा कर्णधार आहे. तो मधली फळी सांभाळतो. जर्मनीची नजरदेखील आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याकडे असेल. २०१३ ला नवी दिल्लीत हा संघ विजेता ठरला होता. २०१६ ला लखनौमध्ये संघाने कांस्य पदक जिंकले. ‘जर्मनीला आम्ही कमकुवत मानणार नाही. मोठ्या स्तरावर हा संघ मुसंडी मारण्यात तरबेज मानला जातो,’ अशी कबुली रीड यांनी दिली.  

हॉकीवर ५ वर्षांत ६५ कोटी खर्च! : भारत सरकारने राष्ट्रीय पुरुष हाॅकी (सिनियर आणि ज्युनियर) संघावर ५ वर्षांत ६५ कोटी रुपये खर्च केला. अशी माहिती क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत