शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

FIH Women's Hockey World Cup : 2876 दिवसांनंतरही भारताच्या विजयाची पाटी कोरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:05 IST

आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात  यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले.

लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात B गटात यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला इंग्लंडच्या लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला आणि 2876 दिवसांनंतरही विश्वचषक स्पर्धेतील भारताची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताकडून नेहा गोयलने एकमेव गोल नोंदवला. भारतीय महिलांनी 5 सप्टेंबर 2010 मध्ये जपानवर 2-0 असा विजय मिळवला होता आणि त्यानंतर या स्पर्धेत त्यांना शनिवारी विजय मिळवण्याची संधी होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन खेळ करताना भारतीय खेळाडूंनी  पंधरा मिनिटांच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला मार्किंगचा डाव खेळला. भारतीय आक्रमणपटूंनी प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रावर सातत्याने चढाई केली. त्यामुळे इंग्लंडला बचावावर अधिक भर द्यावा लागला. 8व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर इंग्लंडला गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी काऊंटर अटॅकचा सुरेख खेळ केला. पण, कोणालाही गोल करता आला नाही. दुस-या सत्रात भारतीयांचा खेळ मंदावलेला जाणवला, परंतु त्यांनी इंग्लंडच्या बचावफळीला व्यग्र ठेवले. इंग्लंडचा सामन्यातील तिसरा कॉर्नरचा प्रयत्न भारताची गोलरक्षक सविताने सुरेख पद्धतीने रोखला. 22 व्या मिनिटाला इंग्लंडला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी त्यांनी थेट आक्रमण न करता रणनिती बदलली. गोलपोस्ट जवळ उभ्या असलेल्या खेळाडूकडे तो चेंडू सोपवण्यात आला, परंतु सविताने त्वरित झेप घेत अप्रतिमरित्या तो अडवला. सविताच्या या कामगिरीने मनोबल उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी अचानक आक्रमण सुरू केले. 25 व्या मिनिटाला त्यांना कॉर्नर मिळाला. निक्की प्रधानने टोलावलेला चेंडू इंग्लंडच्या हॅना मार्टिनच्या पायावर लागल्याने त्यावर थेट गोल करण्याची संधी भारताने गमावली. मात्र, नवज्योत कौरने चेंडूवर त्वरित ताबा मिळवताना इंग्लंडच्या खेळाडूंना चकवून चेंडू नेहा गोयलकडे सुपूर्द केला. नेहाने कोणतीच चूक न करता चेंडू सहज गोलजाळीत धाडला. त्या जोरावर भारताने मध्यंतराला 1-0 अशी आघाडी घेतली.पहिल्या दोन सत्रात भारताने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ केला. मध्यंतरानंतर भारताने त्याच जोशात खेळ पुढे नेला. भारतीय खेळाडूंनी सातत्याने इंग्लंडच्या D क्षेत्रावर आक्रमण केले. इंग्लंडनेही पलटवार केला, परंतु सविताने त्यांना यश मिळू दिले नाही. तिस-या सत्रातही भारताने 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. अखेरच्या सत्रात इंग्लंडचे खेळाडू दबावाखाली दिसले. त्यात मिळालेल्या कॉर्नरवर गोल करण्यात अपयश येत असल्याने त्यांच्यावरील दडपण वाढले. 53व्या मिनिटाला सविताने चोख बचाव करूनही दीपिकाच्या एका चुकीने इंग्लंडला गोल करण्याची संधी मिळाली. त्यावर लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर इंग्लंडकडून वेळ काढू खेळ झाला आणि भारताला बरोबरीवरच समाधान मानावे लागले. 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा