शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चक दे! चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 20:18 IST

स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला 4-0नं लोळवलं

ब्रेडा: भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच सामन्यात सफाईदार विजय मिळवत भारतानं स्पर्धेची झोकात सुरुवात केली. नेदरलँडमधील ब्रेडा येथे ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताच्या या विजयात रमनदीप सिंग, दिलप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रमनदीप सिंगनं 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सामन्याच्या पूर्वार्धात पाकिस्ताननं चांगला खेळ केला. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आलं. पहिल्या सत्रात भारतानं दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र या दोन्ही पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला अपयश आलं. भारताच्या आक्रमणपटूंनी अनेकदा प्रतिस्पर्ध्यांच्या गोलपोस्टवर धडक दिली. तर भारतीय बचावपटूंनी पाकिस्तानचं आक्रमण मोडून काढण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.सामन्याच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये भारतीय संघाच्या आक्रमणाला आणखी धार दिली. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये भारतानं तीन गोल डागले. दिलप्रीत सिंगनं 54 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी केल्यावर मनदीप सिंगनं 57 मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. यानंतर रमनदीपनं 60 व्या मिनिटाला स्वत:चा सामन्यातील दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. पहिलीवहिली चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविरुद्ध होईल.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानHockeyहॉकी