शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड, कोरियालाही नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 18:08 IST

Asian Games 2018: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे.

जकार्ता - भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. भारताने गटातील चौथ्या लढतीत दक्षिण कोरियावर 5-3 असा दणदणीत विजय मिळवला. 

भारतीय संघाने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करताना भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. एस व्ही सुनील आपल्या अनुभवाच्या जोरावर दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना चांगले चकवत होता. चौथ्या मिनिटाला चिंग्लेनसाना सिंगने सुरेख मैदानी गोल करताना भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. पहिल्या पंधरा मिनिटांत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. 

दुसऱ्या सत्रातही भारतीय खेळाडूंनी सामन्यावरील पकड कायम राखली. 16व्या मिनिटाला ललित उपाध्यायने तिसऱ्या गोलची नोंद करून भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. पण, कोरियाच्या खेळाडूंनी बचावात सुधारणा करताना भारताला केवळ एका गोलवर समाधान मानण्यास भाग पाडले. मध्यंतराला भारताकडे 3-0 अशी आघाडी होती.मध्यंतरानंतर कोरियाकडून पलटवार झाला.  कोरियाच्या जुंग मानजे याने 33 व 32 व्या मिनिटाला गोल करताना पिछाडी 2-3 अशी कमी केली. कोरियाच्या या कमबॅकमुळे भारतीय खेळाडू चांगलेच बावरले होते, परंतु त्यांनी वेळेत स्वतःला सावरले. त्यानंतर मनप्रीत सिंग व आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला पुन्हा 5-2 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनिटापर्यंत कोरियाकडून बरोबरीचे प्रयत्न झाले. त्यांना शेवटच्या मिनिटात दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यांना बरोबरी साधता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना एक गोल करण्यात यश मिळाले. पण, भारताला 5-3 असा विजय मिळवण्यात यश आले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाHockeyहॉकीSportsक्रीडा