शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारत-पाकिस्तान यांच्यात हॉकीची गोल्डन मॅच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 12:35 IST

Asian Games 2018:भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत ऐटित प्रवेश केला आहे.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत ऐटित प्रवेश केला आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकीतील सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भारतीय क्रीडा प्रेमी पाहत आहेत. पण, भारतीय पुरुष संघाच्या मार्गात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अडथळा निर्माण करू शकतो. भारतीय पुरुष संघाने अ गटातील पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत धडक दिली. पाच सामन्यांत जवळपास 76 गोल्सचा पाऊस पाडला, तर प्रतिस्पर्धी संघांना केवळ तीनच सामने भारताविरोधात करता आले. भारतीय खेळाडूंचा खेळ पाहता त्यांना जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. उपांत्य फेरीत भारताला मलेशियाचे आव्हान पेलावे लागेल. मलेशियाने ब गटात 12 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांनीही 41 गोल केले, तर केवळ 6 गोल प्रतिस्पर्धी संघाला करू दिले. त्यामुळे उपांत्य फेरीत दोन्ही संघांच्या बचावफळीचा कस लागणार आहे.भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघही चांगलाच फॉर्मात आहे. त्यांनीही गटातील पाचही सामने जिंकून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासमोर जपानचे आव्हान असणार आहे. जपानने अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांना नमवणे इतके सोपं जाणार नाही. पण, 2022च्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आशियाई सुवर्णपदक जिंकणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ते जंगजंग पछाडण्यास सज्ज आहेत.उपांत्य फेरीच्या अपेक्षित असलेल्या निकालानुसार भारत आणि पाकिस्तान यांना विजय मिळवल्यास अंतिम फेरीत गोल्डन सामना पाहायला मिळेल. पण, भारतीय संघही ऑलिम्पिकचा थेट प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणे अपेक्षित आहे. या दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकूया...

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHockeyहॉकी