शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Asian Game 2018 : 32 वर्षीय सरदार सिंग विराट कोहलीपेक्षा फिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 12:03 IST

Asian Game 2018 : भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.

ठळक मुद्देभारतासह, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हा तंदुरूस्त खेळाडू आहे.

मुंबई - भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. मागील दहा वर्षांत अनुभवी खेळाडू सरदारला प्रथमच संघाबाहेर बसावे लागले होते. त्यामुळे सरदारने पुन्हा एकदा आपल्या तंदुरूस्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यापुढे कोणालाही आपल्या तंदुरूस्तीवर बोट उचलता येणार नाही, याची दक्षता त्याने घेतली आहे. 

मागील चार महिन्यांपासून सरदार स्वतःला पूर्णपणे तंदुरूस्त करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे आणि त्याने अखेर आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. संघाचे सध्याचे प्रशिक्षक हरेंदर सिंग यांनी सर्वात अनुभवी खेळाडूला संघात पुन्हा स्थान दिले आहे. हे स्थान त्याने मागील कामगिरीच्या जोरावर नाही, तर स्वतःचा ताकदीवर मिळवले आहे. त्याने त्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. जिममध्ये त्याने बराच काळ घाम गाळला, स्टॅमिना व गती वाढवण्यासाठी विशेष वर्कआऊट केले.  'उसेन बोल्ट कशा प्रकारे कसरत करतो, हे मी पाहिले आणि त्याचे अनुकरण केले,'असे सरदारने सांगितले. नुकत्याच दिलेल्या Yo-yo चाचणीत त्याने 21.4 गुणांसह स्वतःचाच 21.3 गुणांचा विक्रम मोडला. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी yo-yo चाचणी घेतली जाते. त्यात खेळाडूची गती, सहनशक्ती आणि स्टॅमिना तपासला जातो. विशेष म्हणजे 32 वर्षीय सरदारने yo-yo चाचणीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकले आहे. कोहलीने चाचणीत 19 गुणांची कमाई केली होती. भारतासह, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये हे सर्वाधिक गुण आहेत.   सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कोहली हा सर्वात तंदुरूस्त आहे, परंतु सरदारने त्याच्यावर मात केली. त्यावरून हॉकीसाठी कोणत्या दर्जाची तंदुरूस्ती लागते याचा अंदाज येतो.  

टॅग्स :Sardar Singhसरदार सिंगHockeyहॉकीSportsक्रीडाVirat Kohliविराट कोहली