शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

भारतीय हॉकी संघ फायनलमध्ये! जपानवर ५-० असा विजय, जेतेपदासाठी मलेशियाशी भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 22:05 IST

Asian Champions Trophy Hockey 2023 : भारताने २०११, २०१६ व २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि ५ वर्षांनंतर त्यांना पुन्हा हा करिष्मा करण्याची संधी आहे. 

Asian Champions Trophy Hockey 2023 : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा उडवला. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर तगड्या मलेशियाचे आव्हान असणार आहे. मलेशियाने उपांत्य फेरीत ६-२ अशा फरकाने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. आकाशदीप सिंग ( १९ मि.) , हरमनप्रीत सिंग ( २३ मि.), मनदीप सिंग ( ३० मि.), सुमित ( ३९ मि.) आणि सेलवम कार्थी ( ५१ मि.) यांनी गोल करून भारताचा ५-० असा विजय पक्का केला. भारताने २०११, २०१६ व २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि ५ वर्षांनंतर त्यांना पुन्हा हा करिष्मा करण्याची संधी आहे. 

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या पर्वातील दोन अपराजित संघ भारत आणि जपान दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भिडले. २०२१ च्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात ढाका येथे जपानकडून भारताचा ३-५ असा पराभव झाला होता. त्याचा वचपा काढण्याची संधी भारताला घरच्या मैदानावर मिळाली आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ३३ पैकी २७ मध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर जपानला ३ विजय मिळवता आले आहेत. गोलरक्षक पी आर श्रीजेशचा हा भारताकडून ३०० वा सामना आहे. पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात भारताने आक्रमणाची धार तीव्र ठेवली, परंतु जपानचा बचाव अप्रतिम राहिल्याने दोन्ही संघांना गोलशून्यवर समाधान मानावे लागले. 

दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी चेंडू एकमेकांकडे पास देत सर्कलपर्यंत नेला आणि आकाशदीप सिंगने अप्रतिम कौशल्य दाखवताना मैदानी गोल करून भारताला १९व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढील चौथ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने ही आघाडी २-० अशी मजबूत करून जपानच्या बचावफळीला सैरभैर केलं. त्याचा फायदा ३०व्या मिनिटाला मनप्रीत सिंगच्या पासवर मनदीप सिंगने मैदानी गोल करून पहिल्या हाफमध्ये ३-० अशी आघाडी मजबूत केली.   दुसऱ्या हाफमध्ये जपानने भारताच्या आक्रमणाला चांगले उत्तर दिले आणि त्यामुळे गोल करण्यासाठी यजमानांना संघर्ष करावा लागला. मनप्रतीने चेंडूवर ताबा राखताना जपानच्या खेळाडूंना चकवले अन् त्याच्या या मेहनतीचे फळ भारताला मिळाले. सुमीतने ( ३९ मि.) अप्रतिम फ्लिक गोल करून भारताची आघाडी ४-० अशी आणखी मजबूत केली.  ५१व्या मिनिटाला आणखी एक मैदानी गोल आला अन् यावेळी लोकल बॉय सेलवम कार्थीने हा गोल केला.  

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतJapanजपानMalaysiaमलेशिया