शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चक दे इंडिया! भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा उडवला धुव्वा, शेजाऱ्यांचं भविष्य चीनवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 22:19 IST

Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : चेन्नईत सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली.

Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : चेन्नईत सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली. चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत IND vs PAK सामना पाहण्यासाठी स्टेडियम हाऊसफूल होते. भारताचा फिरकीपटू आर अश्विन हा पण सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताने स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व कायम राखताना पाकिस्तानचा ४-० अशा धुव्वा उडवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल आणि जुगराज सिंग व आकाशदीप सिंग यांच्या प्रत्येकी १ गोलने भारताचा विजय पक्का केला. आता पाकिस्तानचे स्पर्धेतील पुढील आव्हान अन्य लढतीवर अलवंबून असणार आहे. 

आजच्या लढतीपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात जय पराजयाच्या आकडेवारीत ६४-८२ असे पारडे पाकिस्तानच्या बाजूने आहे. उभय संघांमधील ३२ लढती ड्रॉ राहिल्या आहेत. पण मागील दहा वर्षांत IND vs PAK यांच्यात झालेल्या २३ पैकी १४ लढती भारताने जिंकल्या आहेत आणि ४ ड्रॉ राहिल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक ६९ गोल्स झाले आहेत आणि पाकिस्तानला केवळ ३६ गोल्स करता आले आहेत. २०२३ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू आर अश्विन हाही स्टेडियमवर उपस्थित होता. भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे, परंतु पाकिस्तानसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. India vs Pakistan

दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारतीय गोलरक्षक कृष्णा पाठक याने तितक्याच चपळाईने पाकिस्तानचा गोल रोखला. दोन्ही संघाकडून कट्टर सामना पाहायला मिळाला आणि पाकिस्तानचा आक्रमक भारताच्या बचावफळीने रोखून धरला होता. १५व्या मिनिटाला भारताकडून पलटवार झाला अन् मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानचे वर्चस्व राहिले, परंतु १५व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगच्या गोलमुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातील हरमनप्रीतच्या ( २३ मि.) आणखी एका पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर भारताने पहिल्या हाफमध्ये २-० अशी पकड बनवली. पाकिस्तानकडून दर्जेदार खेळ झालेला पाहायला मिळाला, परंतु पहिल्या हाफमध्ये नशीब भारताच्या बाजूने होते. तिसऱ्या सत्रात भारताने तिसरा गोल केला अन् यावेळी जुगराज सिंगने ( ३६ मि.) पेनल्टी कॉर्नरवर यश मिळवून दिले. या गोलनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची संघर्ष करण्याची इच्छाशक्तीच गेलेली दिसली. भारताने ५ पैकी तीन पेनल्टी कॉर्नर यशस्वी करून दाखवले. चौथ्या सत्रात भारताने बचाव आणखी मजबूत करून पाकिस्तानला हतबल केले. त्यांच्या बचावातील त्रुटीचा फायदा उचवून आकाशदीप सिंगने ( ५५ मि.) अप्रतिम मैदानी गोल करून भारताचा ४-० असा विजय पक्का केला. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानHockeyहॉकी