शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

आशिया कप महिला हॉकी :भारताचा सलग दुसरा विजय, चीनवर ४-१ ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:01 IST

भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू कामगिरी करताना आशिया कप हॉकी स्पर्धेत सोमवारी चीनचा ४-१ ने पराभव केला. काकामिगहराच्या कावासाकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारतातर्फे गुरजित कौर (१९ वा मिनिट), नवज्योत कौर (३२ वा मिनिट), नेहा गोयल (४९ वा मिनिट) आणि कर्णधार राणी रामपाल (५८ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले.

काकामिगहरा : भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू कामगिरी करताना आशिया कप हॉकी स्पर्धेत सोमवारी चीनचा ४-१ ने पराभव केला. काकामिगहराच्या कावासाकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारतातर्फे गुरजित कौर (१९ वा मिनिट), नवज्योत कौर (३२ वा मिनिट), नेहा गोयल (४९ वा मिनिट) आणि कर्णधार राणी रामपाल (५८ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले. यापूर्वी सलामी लढतीत भारताने सिंगापूरचा १०-० ने धुव्वा उडवला होता.भारतीय संघाने आज सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. पहिल्या क्वार्टरमध्ये संघाने पेनल्टी कॉर्नरही वसूल केला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये संधी गमावल्यानंतर दुसºया क्वार्टरमध्ये चौथ्या मिनिटाला ड्रॅगफ्लिक स्पेशालिस्ट गुरजित सिंगने शनदार गोल नोंदवीत भारताला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराच्या दोन मिनिटांनेतर कौरने मैदानी गोल नोंदवीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, ३८ व्या मिनिटाला भारतीय बचाव फळीच्या चुकीचा लाभ घेताना चीन पेनल्टी कॉर्नर मिळवला व त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. अखेरच्या क्वार्टरमध्ये चीनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.दरम्यान, नेहा गोयलने भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाला दोन पेनल्टी कॉर्नरवर तर चीनला एका पेनल्टी कॉर्नरवर गोलची नोंद करता आली नाही. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना राणीने मैदानी गोल नोंदवीत भारताचा विजय निश्चित केला. भारतीय संघाला आज मंगळवारी गटातील अखेरच्या लढतीत मलेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी