मजुरीच्या पैशावरून युवकाचा खून

By Admin | Updated: March 2, 2015 13:45 IST2015-03-02T13:45:12+5:302015-03-02T13:45:12+5:30

मजुरीच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने युवकाचा खून केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी जिंतूर शहराजवळ घडली.

Youth's blood on wages | मजुरीच्या पैशावरून युवकाचा खून

मजुरीच्या पैशावरून युवकाचा खून

जिंतूर : मजुरीच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने युवकाचा खून केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी जिंतूर शहराजवळ घडली. 
शहरातील बामणी प्लॉटभागात राहणार्‍या सलाम खान कय्युम खान पठाण (वय ४0) यास फसलोद्दीन बद्रोद्दीन काजी याने पैशाच्या वादाच्या कारणावरून घरातून बोलावून नेले. शहरापासून एक किमी अंतरावरील येलदरी महामार्गावरील काजी यांच्या ज्वारीच्या शेतात धारदार शस्त्राने सलाम खान कय्युम खान पठाण यांच्यावर वार करून त्याचा खून केला. ही घटना २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान घडली. 
यासंदर्भात खुद्दूस खान कय्युम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून फसलोद्दीन बद्रोद्दीन काजी याच्याविरूद्ध जिंतूर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. /(वार्ताहर)

Web Title: Youth's blood on wages