शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बासंबा शिवारात युवकाचा दगडाने ठेचून खून, एकास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:42 IST

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला. 

बासंबा (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात दगडाने ठेचून एका युवकाचा खून झाल्याची घटना २२ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. बासंबा पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

फेरोजखान फरीदखान पठाण (रा. येळी ता. हिंगोली) असे खून झालेल्या मयत युवकाचे नाव आहे. बासंबा शिवारात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास आडे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, पोलिस अंमलदार कैलास गुंजकर, गजानन कऱ्हाळे, प्रविण राठोड, शेख उमर, चंद्रशेखर काशिदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी रस्त्याच्या शेजारी युवकाचा मृतदेह आढळून आला. तसेच बाजूला दगड, लाकडी दांडा पडलेला दिसून आला. त्यामुळे युवकाचा खूनच झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मयत युवकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता येळी येथील फेरोज खान फरीद खान पठाण यांचा मृतदेह असल्याचे चौकशीत आढळून आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला. 

खून प्रकरणात एकास घेतले ताब्यातफेरोज खान फरीद खान पठाण यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शुक्रवारी मयत हा मित्रांसोबत गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. अन्य एकाच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. अधिक तपासानंतरच खूनातील मारेकरी कोण व खूनाचे कारण स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी