वसमत (जि.हिंगोली) : शहरपासून जवळच असलेल्या उघडीनदी परिसरातील आखाड्यावर धारदार शस्त्राने वार करून एका ३२ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने वसमत परिसरात खळबळ उडाली आहे.
उघडीनदी परिसरातील शेतात असलेल्या आखाड्यावर विश्वनाथ राजेंद्र कदम (रा.ब्राह्मणगल्ली, वसमत) याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, जमादार शेख हकीम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला असून, पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.