हयातनगर येथील हयातपाशा दर्गा व बाराशीव येथील जागृत हनुमानची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:24+5:302021-02-10T04:30:24+5:30

सध्या संपूर्ण देशभर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे दोन्ही ठिकाणांच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना ...

Yatra of Hayatpasha Dargah at Hayatnagar and Jagrat Hanuman at Barashiv canceled | हयातनगर येथील हयातपाशा दर्गा व बाराशीव येथील जागृत हनुमानची यात्रा रद्द

हयातनगर येथील हयातपाशा दर्गा व बाराशीव येथील जागृत हनुमानची यात्रा रद्द

सध्या संपूर्ण देशभर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे दोन्ही ठिकाणांच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कोरोना आजारावर अद्यापपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय नसल्याने त्यामुळे हयातनगर येथे हयातपाशा दर्गा उरुस व बाराशिव जागृत हनुमान येथील ठिकाणांच्या यात्रेस जमणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. तसेच या पुढील कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक जमा होणारे धार्मिक कार्यक्रम, मेळावे, यात्रा महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जीवितहानी होऊ नये या दृष्टीने सुरक्ष‍िततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये भरणाऱ्या यात्रा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रद्द केल्या आहेत.

Web Title: Yatra of Hayatpasha Dargah at Hayatnagar and Jagrat Hanuman at Barashiv canceled