कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई गाेरक्षनाथ यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:44+5:302021-01-24T04:13:44+5:30

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देत, ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी वाई गाेरक्षनाथ येथील यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात ...

Y Gaerakshanath Yatra canceled on the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई गाेरक्षनाथ यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई गाेरक्षनाथ यात्रा रद्द

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देत, ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी वाई गाेरक्षनाथ येथील यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात देवस्थान संस्थानकडून माहिती देण्यात आली आहे.

वाई गाेरक्षनाथ येथील यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतरही राज्यातून दरवर्षी भाविक हजेरी लावत असतात. या यात्रेची तयारी महिनाभरापासून सुरू असते. मात्र, या वर्षी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही यात्रा रद्द केल्याचे संस्थानचे अध्यक्ष दुलबाराव कदम व समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक वर्षांची पंरपरा खंडित झाली आहे. मात्र, गाेरक्षनाथ महाराज यांचा अभिषेक करून प्रसाद वाटण्यात येणार असून, यावेळी सामाजिक नियमांचे पालन करण्यात येणार आहेत, तसेच पालखी व रथाची मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. फाेटाे नं. ०९

Web Title: Y Gaerakshanath Yatra canceled on the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.