शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाहह...हे तर सोन्याहून पिवळं! हळदीला १९ हजारांचा भाव

By रमेश वाबळे | Updated: May 2, 2024 18:23 IST

हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांतून हळद विक्रीसाठी येत असल्याने आठवडाभरापासून आवक विक्रमी होत आहे.

हिंगोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाली; मात्र समाधानकारक मिळत आहे. येथील संत नामदेव मार्केट यार्डात २ मे रोजी दरवाढीची झळाळी मिळाली आणि १९ हजारांपर्यंत भाव गेला.

येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांतून हळद विक्रीसाठी येत असल्याने आठवडाभरापासून आवक विक्रमी होत आहे. ३० एप्रिल रोजी १५ ते १७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली होती. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तम मार्केट यार्ड बंद होते. त्यानंतर २ मे रोजी हळदीची बीट झाली. या दिवशी पुन्हा दरवाढीची झळाळी मिळाल्याने १९ हजार रुपयांपर्यंत भाव गेला. तर सरासरी १६ हजार ५०० ते १७ हजार रुपयांदरम्यान भाव राहिला.

आवक वाढत असल्यामुळे भाव किंचित घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हळद तयार आहे, त्यातील बहुतांश शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. तर काहींना अजून भाव वाढण्याची आशा आहे.

सोयाबीन साडेचार हजारांखाली...उत्पादनात झालेली घट आणि कवडीमोल भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहेत. उत्पादनात घट झाल्याने किमान ६ हजार रुपये भाव मिळेल, अशी आशा होती; मात्र सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही. दरकोंडी कायम राहिल्याने सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. हाती येणाऱ्या उत्पन्नातून लागवडीही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हरभऱ्याची आवक घटली...यंदा जिल्ह्यात गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा अधिक झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात वाढ झाली. २ मे रोजी मोंढ्यात ४०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ६०० ते ६ हजार १२० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. तर गव्हाचे उत्पादन यंदा कमी असल्यामुळे भाव तेजीत आहेत. चांगल्या गव्हाला ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड