महाआवास अभियानांतर्गत कळमनुरीत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST2020-12-31T04:29:03+5:302020-12-31T04:29:03+5:30
२० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०० दिवसांच्या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, ...

महाआवास अभियानांतर्गत कळमनुरीत कार्यशाळा
२० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०० दिवसांच्या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी घरकुल योजनेअंतर्गत मिशन मोडमध्ये महाआवास अभियान राबविण्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. तहसीलदार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली, तर गटविकास अधिकारी ए. टी. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानांतर्गत राज्यात प्रथम येण्यासाठी व २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल मिळण्याच्या अनुषंगाने तालुक्याने त्याप्रमाणे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाचे स्वरूप व विविध स्तरावर मिळणारे गुण याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकुलांना गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व घटक पंचायतराज संस्थेचे सहा. विविध संस्थांचा सहभाग वाढविणे. लाभार्थी व ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणून हा उद्देश सफल करणे, याबद्दल मार्गदर्शन केले.