महिला लोकशाही दिनाचे १९ एप्रिल रोजी आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:39+5:302021-04-17T04:29:39+5:30

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ...

Women's Democracy Day organized on 19th April | महिला लोकशाही दिनाचे १९ एप्रिल रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १९ एप्रिल रोजी आयोजन

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या dwandcdoh@gmail.com व dwandcdoh@yahoo.co.in या ई-मेल पत्त्यावर सादर करावेत. कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्ज फक्त ई-मेल संदेशाद्वारेच स्वीकारण्यात येतील. तसेच यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर, असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Web Title: Women's Democracy Day organized on 19th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.