इडोळी गावात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:36 IST2018-09-18T15:35:14+5:302018-09-18T15:36:23+5:30

तालुक्यातील इडोळी येथे अवैधरित्या दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

Women's demand for alcholol ban to police in Eidoli village | इडोळी गावात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

इडोळी गावात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

हिंगोली : तालुक्यातील इडोळी येथे अवैधरित्या दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे गावात दारूबंदीसाठी करावी या मागणीसाठी महिलांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. दारूबंदीबाबत महिलांनी एक निवेदन यावेळी पोलीस प्रशासनाकडे सादर केले.

गावात सर्रासपणे देशीदारूची विक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. तरूणाई व्यसनाधिन बनत आहे. पती-पत्नीमध्ये रोजचे भांडण हा नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यामुळे गावात अशांतता पसरली आहे. त्यामुळे इडोळी परिसरात अवैधरित्या सुरू असलेली दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात जमल्या. 

Web Title: Women's demand for alcholol ban to police in Eidoli village