ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: January 20, 2017 15:57 IST2017-01-20T15:57:01+5:302017-01-20T15:57:01+5:30
जावयाच्या बाईकवरुन प्रवास करणारी महिला तोल जाऊन खाली पडली. यावेळी मागून येणा-या ट्रकने चिरडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 20 - जावयाच्या बाईकवरुन प्रवास करणारी महिला तोल जाऊन खाली पडली. यावेळी मागून येणा-या ट्रकने चिरडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अकोला ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे.
मृत महिलेचे नाव कौसाबाई इंगोले असे असून त्या मंगरूळपीर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी होत्या. जावयासोबत बाईकवरुन त्या हिंगोलीमार्गे प्रवास करत होत्या.
याचदरम्यान, वडद फाट्याजवळ त्यांचा अचानक तोल गेला, आणि मागून येणा-या ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागीच सोडून घटनास्थळावरुन फरार झाला.