गावांच्या विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करणार : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:35+5:302021-02-05T07:56:35+5:30
हिंगोली : जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्यांवर विकासाची मोठी जबाबदारी ...

गावांच्या विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करणार : पालकमंत्री
हिंगोली : जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्यांवर विकासाची मोठी जबाबदारी आली आहे. गावचा विकास करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले पाहिजे. यासाठी गाव विकासकामांसाठी लागणारा निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
हिंगाेली येथील साई रिसोर्ट येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड व अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी खा. राजीव सातव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, राजू गोडसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, प्रदेश सचिव अमर खानापुरे, जिल्हा प्रभारी दादासाहेब मुंडे, प्रदेश सचिव अब्दुल हाफिज, महमद जकी कुरेशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ॲड. बाबा नाईक यांची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित तेराशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांचा फेटे घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखपानपट्टे, दीपक राठोड यांनी केले तर आभार विलास गोरे यांनी मानले. फाेटाे नं. १५