वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:17+5:302021-07-08T04:20:17+5:30
गतिरोधक बसविण्याची मागणी हिंग़ोली : शहरातील पोस्ट ऑफिस रस्ता, स्टेशन रस्ता या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. काही वाहनचालक ...

वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
गतिरोधक बसविण्याची मागणी
हिंग़ोली : शहरातील पोस्ट ऑफिस रस्ता, स्टेशन रस्ता या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. काही वाहनचालक वाहनाची गती जास्त ठेवत असल्यामुळे वाहनावर चालकांचे नियंत्रण राहत नाही. वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन संबंधित विभागाने पोस्ट ऑफीस रोड- रेल्वे स्टेशन रोड येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
‘नळांना पाणी वेळेवर सोडावे’
कळमनुरी : गत काही दिवसांपासून शहरातील अनेक वॉर्डात नळांना पाणी वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी ताटकळत बसून रहावे लागत आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने या बाबीची दखल घेऊन पावसाळ्यात तरी नळांना पाणी वेळेवर सोडावे, अशी मागणी शहरातील नळधारकांनी केली आहे.
बसस्थानकाला घाणीचा विळखा
औंढा नागनाथ : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. पाणीपाऊच, पाण्याच्या बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या बसस्थानकात अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.