शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:46 PM

सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.सध्या वन विभागातील वृक्षतोड तर कधी वनव्यामुळे झाडे भुईसपाट झालीे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात तर आलाच आहे, त्याहून गंभीर म्हणजे प्राण तापत्या उन्हात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अनेकदा मृत्यूमुखीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्यासाठी बनविलेल्या ३१ कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात २५ हजार ४७५ हेक्टर वनक्षेत्र असून, त्यामध्ये विविध जातीचे १ हजार ३४९ प्रकारचे प्राण्यांचा अधिवास आहे. तर जंगलात नैसर्गिक १४४ पाणवठे आहेत. मात्र पावसाळ्याचे दोन ते तीन महिने सोडले तर इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती केल्याशिवाय पर्यायच नाही. उन्हाळ्यात तर भयंकर स्थिती होते. पाण्याच्या शोधात निघालेले प्राणी अनेकदा वाहनाला धडकत आहेत, तर कुठे विहिरीत पडत आहेत. ही भटकंती थांबावी म्हणून वन विभागाने याही वर्षी टँकरद्वारे पानवठ्यात पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बारमाही पाणी राहणारे ८ तलाव, ८ धरणे आहेत. वन तळे २ अणि पाणवठे व इतर ८ ठिकाणी वर्षभर पाणी राहते. तर हंगामी पाणीसाठ्याची संख्या जास्त आहे. हंगामी वनतळ्यांची संख्या १४० असून, माती नाला बांध ६३ आणि सिमेंट नाला बांध १७ असे एकूण ३१ पाणवठ्यांची संख्या आहे. आजघडिला सर्वच पाणवठे कोरडेठाक असल्यामुळे शासकीय टँकरद्वारे या पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्याठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. पाणी सोडल्यानंतर त्याची छायाचित्रे दिलेल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याच्या सूचना वनविभागाडून दिल्या आहेत. वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दरवर्षी कायम असल्याने वन्यप्राण्यांसाठीही वेगळे उपाय करावे लगात आहेत. तर उन्हामुळे झालेल्या पानगळीचाही फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. मात्र वन विभागाकडून पाणवठ्यात पाणी सोडले जात असल्याने मानवी वस्त्याकडे वन्यप्राण्यांची धाव कमी होण्यास मदत झाली आहे.भेडकी ६, चितळ- हरीण ८१, निलगाय- रोही ६२७, वानर ९५, रानकुत्रा ३०, रानडुक्कर ३२३, रानमांजर ६, तडस ३, मोर १२७, काळविट २१, ससा व इतर ३० असे १ हजार ३४९ वन्य प्राण्यांची बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी गणना झाल्याची नोंंद वन विभागाकडे आहे. यात अजूनही वाढ असण्याची शक्यता आहे.काही दिवसांपुर्वी वन्य प्राणी पाण्यासाठी शहर किंवा गावाकडे, मानवी वस्तीकडे धाव घेत होते. मात्र पाणठ्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची धाव थांबली आहे. तसेच प्राण्यांच्या अपघाताचेही प्रमाण घटले आहे.सध्या तापमान जास्त असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात असल्याचे वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणी