शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुले सोडून पत्नी प्रियकरासोबत पळाली; जगण्यात अर्थ नाही म्हणत पतीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:49 IST

पती कामानिम्मित दुसऱ्या शहरात; इकडे शेजाऱ्यासोबतच पत्नीचे जुळले सुत

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पत्नीच्या अनैतिक वर्तनास कंटाळून पतीने गावाकडे येऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आपली पत्नी शेजाऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करत असल्याची माहिती पतीला मिळाली. कुटुंबीय, नातेवाईकांनी समजावल्यानंतरही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अखेर पतीनेच पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समज दिली, तर त्यांनीच पतीला आमच्यामध्ये पडू नको म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला कंटाळून पतीने आत्महत्या केली.

मयत अशोक दत्तराव भिसे (३५, रा. जरोडा, ता. कळमनुरी) याचे लग्न गावाशेजारील येलकी गावातील दुर्गा नावाच्या मुलीसोबत २००७ मध्ये झाले. त्यानंतर दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य झाली. कामानिमित्ताने ते औरंगाबाद येथे बजाजनगर येथे भाड्याने राहत व कंपनीत काम करत होते. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर पतीसोबत तिचे बिनसत गेले. पतीने सदरील बाब आई, भाऊ, सासू-सासरे यांच्या कानावर घातली. सर्वांनी तिची समजूत काढली व नीट राहण्याबाबत समज दिली. परंतु, तिच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही.

अखेर पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समजावले. परंतु, त्या दोघांनी पतीलाच धमकी दिली. तू आमच्यामध्ये पडू नकोस, असा सज्जड दम देत जिवे मारण्याची धमकी दिली. एके दिवशी प्रियकरासोबत ती मुले पतीजवळ सोडून निघून गेली. त्यानंतर तो आपले मूळ गाव जरोडा येथे परतला व नातेवाईकांना सांगून माझ्या जीवनात काही अर्थ नाही, असे म्हणाला. ३१ जानेवारी रोजी त्याने जरोडा गावातील आबादानीजवळील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी प्रभाकर दत्तराव भिसे यांच्या तक्रारीवरून पत्नी दुर्गा अशोक भिसे व तिचा प्रियकर शंकर (रा. हल्ली मुक्काम औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रियकराचे नाव विचारले असता मयताच्या घरच्यांना प्रियकराचे पूर्ण नाव माहिती नाही, असे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी