तोलूनमापून भाजीपाला घेणारा ग्राहक, पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:08+5:302021-03-18T04:29:08+5:30

तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ : कोरोना काळातही फिरणे सुरुच हिंगोली : पेट्रोल- डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही कोरोना काळात ...

Why does a consumer who weighs vegetables neglects the petrol pump? | तोलूनमापून भाजीपाला घेणारा ग्राहक, पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

तोलूनमापून भाजीपाला घेणारा ग्राहक, पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ : कोरोना काळातही फिरणे सुरुच

हिंगोली : पेट्रोल- डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही कोरोना काळात वाहनचालकांचे फिरणे काही संपत नाही. महागाईच्या काळात कोणतीही तक्रार न करता पेट्रोल-डिझेल भरणे सध्या सुरुच आहे.

एरव्ही भाजीमार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला झाला तरी तोलूनमापून भाजीपाला विकत घेतो. परंतु, पेट्रोलपंपावर मात्र जेवढे दर आहे तेवढेच पैसे देऊन गाडी चालविणारा वाहनचालक कोणतीही तक्रार न करता गुपचूप वाहन चालविताना दिसून येत आहे. शहरात आजमितीस पाच पेट्रोलपंप आहेत. या पाच पेट्रोल पंपावर १२ हजार लिटर डिझेल, १५ हजार ६०० लिटर दररोज पेट्रोलची विक्री होत असते. वैधमापन शास्त्र विभागाला याबाबत विचारले असता चार वर्षात तरी एकही तक्रार आलेली नाही, असे सांगण्यात आले. वैधमापन विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. या विभागात एक प्रभारी अधिकारी, एक क्लार्क आणि शिपाई कार्यरत आहे. ग्राहक जसे भाजीपाला तोलूनमापून घेतात त्याप्रमाणे वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल किमतीच्या बाबतीत सतर्कता बाळगणे गरजेचे

आहे.

शहरातील पेट्रोल पंप- ५

१२ हजार दररोज विक्री होणारे डिझेल

१२ हजार ६०० दररोज विक्री होणारे पेट्रोल

बॉक्स

वर्षभरात एकही तक्रार नाही

वर्षभरात एकही तशी गंभीर तक्रार आली नाही. पेट्रोल, डिझेल बद्दल कोणी तक्रार केल्यास पंचासमक्ष त्याची शहानिषा करुन त्यावर कार्यवाही केली जाते. परंतु, गत चार वर्षात तरी तशी कोणती गंभीर अशी तक्रार कोणीही केलेली नाही.

प्रतिक्रिया

पेट्रोल व डिझेल बाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. कोणी तक्रार केल्यास लगेच त्याची

शहानिशा केली जाते.

- संभाजी बिलपे, प्रभारी वैधमापन अधिकारी, हिंगोली

तपासणी सुरुच असते

ग्राहक तक्रार करो अथवा न करो तपासणी तर वैधमापन विभाग करत असतो. तपासणी वर्षातून दोन-वेळा नियमाप्रमाणे सुरुच असते.

वैधमापन विभागाकडे तीन- चार वर्षात एकच तक्रार आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Why does a consumer who weighs vegetables neglects the petrol pump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.