शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष कायम! दिव्यांग मुलीने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हा आई मात्र शेतात राबत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:52 IST

गंगासह आठ बहिणी असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, बहिणींसह आई-वडील शेतमजुरीत मदत करतात.

हदगाव (जि. नांदेड) : प्रतिकूल परिस्थिती, घरातील अडचणी आणि शारीरिक अपंगत्व या सर्वांवर मात करून गंगा कदम हिने क्रिकेटसारख्या खेळात चमकदार कामगिरी करत भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून वर्ल्डकप जिंकण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. तिच्या या कामगिरीचा देशभरात उत्सव साजरा होत असताना गंगाची आई मात्र नेहमीप्रमाणे शेतात राबत होती. याची आठवण गंगाने गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सांगताच उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे डोळे पाणावले. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी फुटाणा या गावी झाला.

गंगासह आठ बहिणी असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, बहिणींसह आई-वडील शेतमजुरीत मदत करतात. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या गंगाने शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. माध्यमिक शाळेतून महाविद्यालयापर्यंत तिने उत्तम कामगिरी करत प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतर ती विभागीय, राज्य आणि मग राष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात पोहोचली. घरची परिस्थिती कठीण असतानाही गंगाने क्रीडा क्षेत्रातील आपला प्रवास खंडित होऊ दिला नाही. स्वतःच्या मेहनतीवर ती देशाच्या संघातील महत्त्वाच्या पदावर पोहोचली. मागील महिन्यात झालेल्या पहिल्या दिव्यांग महिलांचा वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व केले. श्रीलंका देशात कोलंबिया येथे नेपाळसोबत अंतिम सामना झाला. यावेळी नेपाळ संघाचा सात विकेटने पराभव करत विजेतेपद पटकावले.

शेतात आहे, घरी जाऊन टीव्ही पाहतेवर्ल्डकपचा आनंद सांगताना गंगाने सांगितले की, आईला मी फोन करून ही गोड बातमी दिली तेव्हा ती शेतात कामात व्यग्र होती. तिने फोन बंद करून ‘घरी जाऊन टीव्हीवर बघते’ असे म्हणत पुन्हा कामाला लागली. हे सांगताना समारंभात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. कार्यक्रमाला पालकमंत्री माणिकराव झिरवाळ, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश आष्टीकर यांची उपस्थिती होती. यावेळी दिल्लीमध्ये तीन खोलींचे घर स्वखर्चाने देण्याचे आश्वासन खासदार आष्टीकर यांनी दिले.

आम्हाला तिचा अभिमानगंगाच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया देत सांगितले, ‘आमच्या मुलीने जगाला भुरळ घातली. आमचे नाव मोठे केले. तिचा आम्हाला अभिमान आहे.’

English
हिंदी सारांश
Web Title : Differently-abled captain wins World Cup; mother toils in the fields.

Web Summary : Despite adversity, Ganga Kadam led India to a World Cup victory. While celebrated, her mother continued working in the fields, highlighting the family's struggles and Ganga's inspiring journey. Her dedication moved many during a felicitation ceremony.
टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी