मातृवंदना योजना काय असते हो ताई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:38+5:302021-03-06T04:28:38+5:30

हिंगोली: गत तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले असून शहरातील ७९ तर ग्रामीण ...

What is Matruvandana Yojana? | मातृवंदना योजना काय असते हो ताई ?

मातृवंदना योजना काय असते हो ताई ?

हिंगोली: गत तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले असून शहरातील ७९ तर ग्रामीण भागातील १०० टक्के महिलांनी लाभ घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

१ जानेवारी २०१७ मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना सुरू करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१७ ते ४ जानेवारी २०२१ या तीन वर्षासाठी जिल्ह्याला २४ हजार ४४४ उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४ मार्च २०२१ पर्यत जिल्ह्याने २३ हजार ८८३ लाभार्थींना लाभ मिळवून देऊन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. याची टक्केवारी ९८ एवढी आहे. शहरी भागात ७९ तर ग्रामीण भागात १०० टक्के काम पूर्ण केल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात २३ हजार ८८३ महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांना पाच हजार रुपयाप्रमाणे ९ कोटी ८ लाख ८८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. हे अनुदान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमाही झाले आहे.

२०१९-२० मध्ये शासकीय रुग्णालयात ११ हजार ९०० तर खाजगी रुग्णालयात ४ हजार ३८५ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. २०२०-२१ या वर्षात शासकीय रुग्णालयात ८ हजार ७९२ तर खाजगी रुग्णालयात ४ हजार ४९४ महिलांनी मातृ वंदना योजनेचा लाभ घेतला. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची माहिती आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात कर्मचारी तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत देण्यात येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत शहरी असो वा ग्रामीण महिलेला एकूण ५ हजारांचे आर्थिक अनुदान देण्यात येते. यासाठी तीन टप्पे पाडण्यात आलेले आहेत.

लाभासाठी यांना साधा संपर्क

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.

आवश्यक कागदपत्रे

१) लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड

२) लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते

३) गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंद

४) शासकीय संस्थेत गरोदर काळात तपासणी

५) बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण

उपरोक्त अटीची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसात लाभाची रक्कम अदा केली जाते.

पहिला हप्ता १०००, दुसरा हप्ता २००० आणि तिसरा हप्ता २०००

शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रसूती

२०१९- ८७९२

२०२०-११९००

खाजगी रुग्णालयात झालेल्या प्रसूती

२०१९-४४९४

२०२०-४३८५

मातृवंदनाचा लाभ घेतलेल्या महिला-२३८८३

Web Title: What is Matruvandana Yojana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.