शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्णाचे वंशज आम्ही...; कृष्णभक्तीत लीन 'या' गावात दूध विक्री होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 17:04 IST

गावात राहणारा बहुतांश गवळी समाज हा नंदवंशीय आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

ठळक मुद्देकृष्ण जन्माष्टमी विशेष दूध न विकणारे कृष्णप्रेमी गाव

- शंकर मुलगीर

पोत्रा (जि. हिंगोली) : शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, पूर्वापार कृष्णभक्तीत लीन झालेल्या कळमनुरी तालुक्यातील येहळेगावात आजही दुधाची विक्री होत नाही. गावात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोठा उत्सव साजरा केला जातो, त्यावर यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे विरजण पडले आहे.

येहळेगाव गवळी या गावात श्रीकृष्णाचे मोठे मंदिर असून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्म, पालखी मिरवणुक, गोपाळकाला असे विविध कार्यकम यानिमित्ताने आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणू ंसंसर्गाच्या संकटाने सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. येहळेगाव गवळी येथे गायी-म्हशींचे पालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे किमान एकतरी गाय आढळून येतेच. गावात राहणारा बहुतांश गवळी समाज हा नंदवंशीय आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गायी-म्हशी पाळल्या असल्या तरी तरी येथे दूध विक्री होत नाही.

श्रीकृष्णाचे वंशज आम्ही... प्रथा सुरूच ठेवूयेहळेगाव ग्रामस्थ याबाबत सांगतात की, कृष्ण कालखंडात वृंदावनातील गवळी दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करीत असत. त्यामुळे दूध शिल्लक राहत नसल्याने बालकांना दूध मिळत नसे. भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात दूध विक्रीची प्रथा मोडण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हापासून गावात दूध विक्री करण्याचा व्यवसाय बंद झाला. येहळेगाव येथील गायी-म्हशीचे पालन करणारा गवळी समाज श्रीकृष्णाचा वंशज असल्याचे सांगून त्यांच्या प्रेमापोटी येथे आजही दूध विक्री न करण्याची प्रथा सुरूच असल्याचे सांगतो. 

टॅग्स :milkदूधHingoliहिंगोलीJanmashtamiजन्माष्टमी