विनामास्क वाढला वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:52+5:302021-05-12T04:30:52+5:30

प्रतिक्रिया.... पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागील महिन्यात मेडिटेशन शिबिर घेण्यात आले होते. पोलीस दरबार घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. ...

Wawar grew without a mask | विनामास्क वाढला वावर

विनामास्क वाढला वावर

प्रतिक्रिया....

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागील महिन्यात मेडिटेशन शिबिर घेण्यात आले होते. पोलीस दरबार घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. सध्या कोरोनामुळे मेडिटेशन, योगा शिबिर घेता येत नसले तरी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर स्थापन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली

पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम, वेळेवर जेवण व किमान चार लिटर पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, कोरोनाचे व्हिडीओ बघणे टाळावे, सहकाऱ्यांसमवेत चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करावी, कुटुंबीय, नातेवाईकांची विचारपूस करावी, यामुळे मनावर ताण येणार नाही. कार्यालयात बैठे काम असल्यास पायांच्या हालचाल महत्त्वाची आहे. तसेच शरीरासाठी व्हिटॅमिन बी-१२ आवश्यक असून यासाठी मांसाहार किंवा पनीर, दूग्धजन्य पदार्थ आहारात घ्यावेत.

-डॉ. दीपक डोणेकर

Web Title: Wawar grew without a mask